Breaking

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

टेंभुर्णी येथे एटी एम ची अदलाबदल करून भामट्याने तरुणाला नव्वद हजार रुपयाला टाकली टोपी*

टेंभुर्णी येथे एटी एम ची अदलाबदल करून भामट्याने तरुणाला नव्वद हजार रुपयाला टाकली टोपी*



टेंभुर्णी : - एटीएम मधून रक्कम काढण्यासाठी गेलेल्या एका तरुणांची नजर चुकवून एटीएम कार्डची अदला-बदल करून एका अनोळखी भामट्याने ९० हजार रुपयांचा गंडा घेतल्याची व सर्वांना अत्यंत सावधानतेचा इशारा देणारी घटना २० मार्च रोजी टेंभुर्णीत घडली आहे.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याविषयी घटनेविषयी अधिक माहिती अशी की,टेंभुर्णी येथील विलास मच्छिंद्र यादव (वय (४०) हा दि.२० मार्च रोजी दु.२ ते ३ वा.सुमारास त्याच्या बँक खात्यात जमा झालेली ऊस बिलाची रक्कम काढण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या जुन्या बस स्टॅण्ड जवळील एटीएम केंद्रात गेला होता.तेथे त्याने रक्कम काढण्यासाठी एटीएम मशीनमध्ये कार्ड घातले असता त्यास रक्कम निघाली नाही.तेव्हा तेथे अनोळखी काहीजण उभे होते.तेवढ्यात कुणीतरी त्यास सुटे पैसे मागितले होते.नंतर यादव हा एटीएम कार्ड मागील पँटच्या खिस्यात ठेवून आयडीबीआय बँकेच्या एटीएम केंद्रात गेला.तेथे जाऊन त्याने एटीएम कार्ड मशीनमध्ये घातले असता तेथे ही त्यास रक्कम निघाली नाही.तसेच काहीतरी इंग्रजीत मेसेज आला तो त्यास समजला नाही.रक्कम निघाली नसल्याने पुन्हा त्याने कार्ड पँटच्या मागील खिश्यात ठेवले.त्यावेळी ही तेथे अनोळखी काहीजण उभे होते.

तो रक्कम न निघाल्याने व पैश्याची अत्यंत गरज असल्याने स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात गेला.तेथे त्याने ग्राहक केंद्रातील सुहास जगताप यास दोन हजार रुपये काढण्यासाठी त्याच्याकडे एटीएम कार्ड दिले.कार्ड मशीनमध्ये टाकले असता त्यावर द्रौपदी बंडू पोटले असे त्यावर नाव लिहिलेले व कार्ड नंबर ४५९११५०३१३५०२७ असे पुसट दिसत होते.यामुळे बँकेत नजर चुकवून अज्ञात कोणीतरी इसमाने कार्डची आदला-बदल करून फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.
यानंतर जगताप व यादव हे दोघे स्टेट बँकेत गेले व त्यांनी मॅनेजरला घडला प्रकार सांगितला असता त्यांनी यादव याचा खाते क्रमांक ३७७४७८५७३२० याचे स्टेटमेंट काढले असता.एटीएम कार्डवरून कार्डवरून काही वेळेपूर्वी सरडेवाडी (ता.इंदापूर) येथील गणेश पेट्रोलपंप येथून ५० हजार व तेथील एटीएम मधून १९ हजार रुपये तसेच इंदापूर येथील ग्राहक केंद्रातून २० हजार रुपये असे एकूण ८९ हजार रुपये काढलेचे निष्पन्न झाले.यावेळी यादव यांच्या विनंतीनुसार बँक मॅनेजर यांनी तात्काळ एटीएम कार्ड बंद केले.
या घटनेची टेंभूर्णी पोलीस ठाण्यात २८ मार्च रोजी विलास यादव याच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा अधिक तपास पोनि राजकुमार केंद्रे हे करीत असून एटीएम मधून रक्कम काढणाऱ्या नागरिकांनी गुप्त पासवर्ड टाकताना कोणी पहात नाही ना याची खात्री करावी.नागरिकांच्या निष्काळजीमुळेच असे गुन्हे घडत आहेत.यामुळे सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन पोनि राजकुमार केंद्रे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा