Breaking

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

यशकल्याणी परिवाराकडून वसंत महोत्सव २०२१ निमित्त ऑनलाईन वक्तृत्व,निबंध व सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन*



*यशकल्याणी परिवाराकडून वसंत महोत्सव २०२१ निमित्त ऑनलाईन वक्तृत्व,निबंध व सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन*


*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

     यशकल्याणी परिवाराच्या वतीने श्रद्धेय श्री.वसंतराव दिवेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी 'वसंत महोत्सव २०२१' चे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.

    यामध्ये प्रामुख्याने श्रद्धेय श्री.वसंतराव दिवेकर वक्तृत्व स्पर्धा,लोकशिक्षिका लीलाताई दिवेकर निबंध स्पर्धा व गुरुवर्य अनंतराव लिमये सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर महोत्सवात  श्रद्धेय वसंतराव दिवेकर वक्तृत्व स्पर्धेसाठी इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्याना (१) आई माझा गुरू (२) छत्रपती शिवाजी महाराज हे विषय असतील.
           इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना १) माझी आदर्श शाळा (२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (३) माझा स्वच्छ परिसर हे विषय असतील त्याचप्रमाणे 
         इयत्ता ८वी ते १०वी साठी (१) मिसाईल मॅन डॉ. अब्दुल कलाम (२) राजर्षी शाहू महाराज (३) जगाचा पोशिंदा शेतकरी (४) ऑनलाईन शाळा शाप की वरदान हे विषय देण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे लोकशिक्षिका लीलाताई दिवेकर निबंध स्पर्धेसाठी इयत्ता १ ली ते ४ थी साठी (१) झाडाचे महत्व (२) आई मला खेळायला जाऊ दे ना! हे विषयआहेत तसेच इयत्ता ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थ्यांना (१) खरे कोरोना योद्धे (२) असा घडवू या महाराष्ट्र (३) वसा घेऊ दुर्गसंवर्धनाचा हवं विषय असतील तर 
इयत्ता ८ वी ते १० वी साठी (१) जगणे महाग होत आहे (२) आत्मनिर्भर भारत (३) मोबाईल शाप की वरदान (४) जीवन करपवणारी तापमान वाढ हे विषय देण्यात आले आहेत.
  तसेच गुरुवर्य अनंतराव लिमये सुंदर हस्ताक्षर स्पर्धेसाठी इयत्ता १ ली ते १० वी मधील सर्व  विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही विषयावर मराठी,हिंदी अथवा इंग्रजी भाषेत सुंदर हस्ताक्षरात निबंध लिहायचा आहे.
सदरच्या तिन्ही स्पर्धेसाठी नियमावली एकच असून या तिन्ही स्पर्धेमध्ये १ ली ते ४ थी साठी प्रथम क्रमांक म्हणून यशकल्याणी मेडल,प्रमाणपत्र व रोख रक्कम १००० देण्यात येईल तसेच द्वितीय क्रमांकास यशकल्याणी मेडल,प्रमाणपत्र व रोख रक्कम ७५० देण्यात येईल तृतीय क्रमांकास यशकल्याणी मेडल,प्रमाणपत्र व रोख रक्कम ५०० इतके तर दोन उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना यश कल्याणी मेडल, प्रमाणपत्र व रोख प्रत्येकी ३०० रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे इयत्ता ५ वी ते ७ वी साठी प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यास यशकल्याणी मेडल,प्रमाणपत्र व रोख रक्कम १५०० देऊन गौरविण्यात येईल.द्वितीय क्रमांकास यशकल्याणी मेडल,प्रमाणपत्र व रोख रक्कम १००० देण्यात येईल तृतीय क्रमांकास यशकल्याणी मेडल,प्रमाणपत्र व रोख रक्कम ७०० इतकी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.दोन उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना यश कल्याणी मेडल, प्रमाणपत्र व रोख प्रत्येकी ५०० रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
त्याचप्रमाणे इयत्ता ८ वी ते १० वी साठी प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यास यशकल्याणी मेडल,प्रमाणपत्र व रोख रक्कम २००० देऊन गौरविण्यात येईल.द्वितीय क्रमांकास यशकल्याणी मेडल,प्रमाणपत्र व रोख रक्कम १५०० देण्यात येईल तृतीय क्रमांकास यशकल्याणी मेडल,प्रमाणपत्र व रोख रक्कम १००० इतकी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.दोन उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना यश कल्याणी मेडल, प्रमाणपत्र व रोख प्रत्येकी ५०० रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेसाठी २० सप्टेंबर शेवटची तारीख असून या स्पर्धेचा निकाल २ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल तर श्रद्धेय श्री.वसंतराव दिवेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ७ ऑक्टोबर २०२१ रोजी  सर्व  विजेत्या विद्यार्थ्यांना यशकल्याणी सेवाभवन करमाळा येथे सन्मानित करण्यात येईल.तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. ह्या स्पर्धा फक्त करमाळा तालुक्यापूरत्या  मर्यादित आहेत. यामध्ये करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा असे आवाहन यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.गणेश करे-पाटील यांनी केले आहे.
भाषणाचा व्हिडिओ अथवा  निबंध स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून त्याचे पी डी इफ अथवा फोटो काढून पान नंबर व्यवस्थित टाकून 8888005557 या व्हाट्सअँप क्रमांकावर पाठवावे.अधिक माहितीसाठी 8329907424 या क्रमांकावर संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा