Breaking

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या उस्मानाबाद जिल्हा सचिव पदी संजय गायकवाड यांची निवड



राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या उस्मानाबाद जिल्हा सचिव पदी - संजय गायकवाड यांची निवड


तुळजापूरः ता. ७

(राष्ट्रीय)विश्वगामी पत्रकार संघाचे

तुळजापूर तालुका सहसचिव पदावर कार्यरत असलेले संजय गायकवाड यांच्या कार्याची दखल घेऊन  राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष चाँदसाहेब शेख व पश्चिम महाराष्ट्र विभागीय संपर्क प्रमुख वसंत कांबळे यांचे शिफारस नुसार भारत सरकार मान्यता प्राप्त (राष्ट्रीय)
विश्वगामी पत्रकार संघाचे संस्थापक  अध्यक्ष संतोष निकम व प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील,नाशिक येथील सोमनाथ मानकर यानीं ही निवड जाहीर केली आहे.
  संजय गायकवाड हे गेली १५ ते २० वर्षांपासून पत्रकारिता व विविध सामाजिक कार्यात तुळजापूर तालुक्यासह जिल्ह्यात सक्रिय राहून त्यांनी पत्रकारीता व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन व मदत केली आहे.त्यांच्या या सर्व कार्याची (राष्ट्रीय) विश्वगामी पत्रकार संघाने दखल घेऊन संजय गायकवाड यांची उस्मानाबाद जिल्हा सचिव पदाची जबाबदारी देऊन पत्रकार संघ अंतर्गत ५४ विंगचे कार्य वाढवून संघटना मजबूत करावी,अशी  अपेक्षा व्यक्त करुन पुढील कार्याच्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा