*शेतकऱ्यांना जोपर्यंत मावेजा मिळत नाही तोपर्यंत रोडचे काम बंद ठेवा : अशोक जगदाळे यांनी शासनाला खडसावले*
जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येते नाही व ज्या शेतकऱ्यांची जमीन रोडमध्ये गेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना जोपर्यंत त्यांच्या जमीनीचा मावेजा मिळत नाही तोपर्यंत नळदुर्ग ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ चे चालू असलेले काम बंद ठेवा या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक भाऊ जगदाळे यांनी संबंधित गुत्तेदार व शासनाला रास्तारोको आंदोलनात खडसावले.
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक६५२ चे नव्याने सिमेंट रस्ता बनविण्याचे काम चालू आहे. या रोड मध्ये ज्या शेकऱ्यांची जमीन गेली आहे. त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमीनीचा मावेजा मिळावा म्हणून रितसर उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे. परंतु न्यायालयाचा कसलाही आदेश नसताना संबंधित गुत्तेदार शेतकऱ्यांची दिशाभूल करून काम चालूच ठेवले आहे. सदर चालू असलेले काम मावेजाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अशोक भाऊ जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना नेते तथा माजी नगरसेवक कमलाकर कका चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीतीत शेतकरी संघर्ष समिती च्या वतीने नळदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ (जुना-९) वर बसस्थानका समोर रास्ता रोको आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
यावेळी अशोक जगदाळे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की ज्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी तुळजापूर विधानसभेच्या आमदाराला निवडुन दिले त्यांनी अतापर्यत याबात ब्रशब्दही काढलानाही असा निशाणा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे नाव न घेता साधून आपण शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत यासाठी संघर्ष करणार असल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख तथा शेतकरी संघर्ष समितीचे सदस्य सरदारसिंग ठाकूर, शीवसेना शहरप्रमुख संतोष पुदाले,सुनील कदम,सोमनाथ गुड्डे,प्रदीप जोशी, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, शिवाजी वराडे,व्यंकट पाटील, महादेव बिराजदार,सह शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय महामार्गाचे सोलापूर चे कार्यकारी उपअभियंता विजयकुमार स्वामी यांनी निवेदन स्विकारले. यावेळी नळदुर्ग पोलीस ठाणे अंतर्गत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा