*तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील कुंभार मळा येथे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप,तसेच इलेक्ट्रिक चाक वाटपाचा कार्यक्रम संपन्न*
अखिल भारतीय प्रजापती महासंघ दिल्ली, व अखिल महाराष्ट कुंभार समाज विकास संस्था यांच्या वतीने कुंभार सशक्तीकरण मिशन अंतर्गत -कौशल्य विकास प्रशिक्षण व ईलेक्ट्रिक चाकावर काम करण्याचे प्रशिक्षण दि.२२.०९.२०२१ ते ०१.१०.२०२१ या कालावधीत सावरगांव येथील कुंभार मळा येथे प्रशिक्षण पूर्ण होत आहे, मनून आज दि.०१. ऑक्टोंबर २०२१,रोजी सकाळी ठीक ११ वाजता प्रशिक्षणार्थी यांना इलेक्ट्रिक चाक वाटप व प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रम, प्रमुख पाहुणे तहसीलदार सौदागर तांदळे,यांच्या उपस्थितीत संपन्न झाले,यावेळी श्री.नागनाथ अण्णा कुंभार उपाध्यक्ष, श्री.मोहनराव जगदाळे,(संस्थापक अध्यक्ष,) महादेवराव खटावकर जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद, आनंद (मालक) बोबडे (उपसरपंच सावरगाव) श्री.भागवत (तात्या) कुंभार अध्यक्ष तुळजापुर तालूका व ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला,यावेळी कुंभार समाज विकास संस्थेचे पदाधिकारी व कुंभार समाज बांधव उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय कुंभार यांनी केले तर आभार भगवान कुंभार यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन कुंभार समाज तुळजापूर तालुका यांनी केले होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा