*राजेंद्र पोकळे हे प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा संघटक व तालुका प्रभारी.... राज्य मंत्री बच्चू कडू*
श्रीगोंदा -नितीन रोही,
प्रहार चे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने
प्रदेशाध्यक्ष बापूराव काणे यांनी दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी चळवळ उभी करणारे राजेंद्र पोकळे यांची श्रीगोंदा तालुका प्रहार दिव्यांग संघटना अहमदनगर जिल्हा संघटक व तालुका प्रभारी पदी निवड केली आहे. पोकळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांच्या साठी जिल्हा रुग्णालयामार्फत श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ६३३ अपंग नागरिकांची तपासणी व प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. पोकळे यांच्या निवडीबद्दल आमदार बबन दादा पाचपुते,जन शक्ति चे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार,नगराध्यक्षा शुभांगी पोटे,गट नेते मनोहर पोटे, शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दूतारे,भाऊसाहेब पुराने,माऊली भैलुमे,साहेबराव रासकर,
पोपट आळेकर(हॉटेल नंदनवन)
डॉ. सोमनाथ देवकाते,संदीप पोकले,सुरेश गलांडे यांच्या सह अनेक मान्यवरांनी पोकळेंचे अभिनंदन केले.
फोटो,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा