*शिवबाराजे प्रतिष्ठान तुळजापूर यांच्या वतीने, विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन*
आज दिनांक 18.12.2021 वार शनिवार रोजी धाराशिव निवासी जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांना तुळजापुर येथे चालु असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे सुशोभिकरण बाबत निवेदन देण्यात आले, या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,
तुळजापुर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे काम चालु असुन,सदर ठिकाणी बसविण्यात येणारे मावळ्याचे पुतळे हे फायबरचे बसविण्यात येणार असल्याबाबत समजले सदर ठिकाणी फायबरचे पुतळे बसविल्यास काही कालावधीत खराब होणार आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी बसविण्यात येणारे पुतळे हे फायबरचे न बसविता ते धातुचे आथवा पाशांनाचे बसविण्यात यावेत जेणेकरून ते जास्त काळ टिकतील.. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आलेला असुन सदर ठिकाणी पुजा करण्यासाठी तसेच महाराजांना पुष्पहार घालण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही तरी यात साहाबांनी लक्ष घालुन शिडीची व्यवस्था करण्यात यावी. तसेच राणी लक्ष्मीबाई उद्यान येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे खवले पडत असुन त्याचा रंग निघालेला आहे याची लवकरात लवकर डागडुजी करण्यात यावे म्हणुन शिवबाराजे प्रतिष्ठाण बजरंग दल यांच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे,या निवेदनावर शिवबा राजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष,अर्जुन (आप्पा) साळुंके, दिनेश सीरसट,विकास वाघमारे, नितिन जट्टे, अभिजीत साळुंखे, पृथ्वीराज कदम, योगेश इंगळे, ऋषी शिंदे, शिवराज वाघमारे, उद्धव देवकर, विशाल काळे, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा