Breaking

शनिवार, १४ मे, २०२२

करमाळा मुस्लीम सामाज बांधवांकडून छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी* करमाळा दि.१४



*करमाळा मुस्लीम सामाज बांधवांकडून छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी*


करमाळा दि.१४
प्रतिनिधी 
छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती करमाळा च्या वतीने शहरातील पोथरेनाका येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास्थळी करमाळा शहरातील मुस्लीम समाजातील करमाळा मुस्लीम सामाजिक व आर्थिक उन्नती अभियान, बहुजन विकास संस्था, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, मुस्लीम विकास परिषद, रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी भेट देऊन छत्रपती संभाजी महाराज यांची ३६५ वी जयंती उत्साहात साजरी केली. 

यावेळी संभाजी महाराजांच्या पुतळ्यास मुस्लीम समाजाच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण म्हणाले कि, छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता. संभाजी महाराजांनी शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनीबाबा यांच्या पालखीस भोई व वाजंत्रीची कायमची व्यवस्था लावून दिली. अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे छत्रपती संभाजी महाराज उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकार होते. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. अशा या महान शूरवीराचा आदर्श युवापिढीने आत्मसात करण्याची गरज आहे.

यावेळी मुस्लीम विकास परिषद अध्यक्ष तथा न.प. दक्षता समितीचे सदस्य हाजी फारूक बेग, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे कार्याध्यक्ष कय्युम शेख, पत्रकार अलीम शेख, अलीम खान, दस्तगीर पठाण, अझीम मोगल, बबलू पठाण, युसुफ शेख सर, आयुब शेख, जमील काझी, जमीर मुलाणी, राजू सय्यद, अकबर सय्यद, अश्रफ तांबोळी, अमीर मोमीन, अमीर शेख, एजाज शेख, फुरकान काझी, कचरू मिर्झा, मुजम्मील शेख, मातीन बागवान, जावेद मणेरी, राजू कुरेशी, बशीर अतार, मतीन अतार, शाहरुख नालबंद, राजू नालबंद, फिरोज मुलाणी, राजू मुलाणी, गुलाम सय्यद, अमीन बेग, तौफिक शेख, आशिश पठाण यांच्यासह मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा