गणेश सहकारी पाणीपुरवठा हरितक्रांती पाणीपुरवठा योजना व कन्हेरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
कन्हेरगाव प्रतिनिधी/अतुल डोके
गणेश सहकारी पाणीपुरवठा हरितक्रांती पाणीपुरवठा योजना व कनेरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन लिंबाजी मोरे हे होते. सुरुवातीला गावातील दहावीतील गुणवंत प्राप्त विद्यार्थि कु. दिव्या केदार, कु. प्रतीक्षा जाधव. कु. साक्षी बरडे कु. ऋतुजा पाटील कु. साक्षी डोके कु. अंजली डोके कु. अंकिता कदम कु. मोहिनी भरंगडे चि. दिग्विजय डोके यशोधन डोके यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी श्री नागेश मोरे सर यांनी आपले विचार व्यक्त केले व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपल्या गावाचे नाव उज्वल करून आयएएस आयपीएस व्हावे आणि देशाची सेवा करावी.जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना गणेश पाणीपुरवठा संस्थेच्या मार्फत मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी हरितक्रांतीचे चेअरमन कीसन खोचरे साहेब बळीराजा शेतकरी संघटनेची बाबुराव डोके राजेंद्र डोके विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन उमेश डोके उपसरपंच दिपक डोके शरद आप्पा डोके ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय माने शिवाजी भरंगडे सोसायटी सदस्य विशाल भरंगडे जयंत पाटील श्रीमंत पाटील तंटामुक्ती अध्यक्ष विकास (आबा) पाटील माजी सरपंच उत्तम पाटील व्हाईस चेअरमन पोपट केदार चंद्रकांत केदार प्रशालेचे मुख्याध्यापक लोंढे सर अप्पा डोके सर नितीन डोके सर सोसायटीची माजी संचालक गणेश माने माझी सरपंच उत्तम पाटील एस एन एम के फुट केअर चे मालक दादासाहेब खोचरे विलास कदम बाळासाहेब डोके बाबासाहेब माने भाऊराव माने महेश माने अमित खोचरे गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक एच.पी पाटील सर यांनी केले या कार्यक्रमासाठी रामलिंग खोचरे उमेश डोके किरण खोचरे यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा