आवाटी ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच पदी परविण खान तर उपसरपंच पदी तनवीर शेख यांची निवड
करमाळा प्रतिनिधी
आवाटी ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडी मध्ये सरपंच पदी जगताप पाटील बागल आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमती परवीण इमरान खान यांची तर उपसरपंच पदी तनवीर आदम शेख यांची निवड झाली आहे सदरची निवड आज आवाटी येथील ग्रामपंचायत कार्यालयात झाली
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सालसे येथील मंडलाधिकारी अमित कुमार कलटवाड हे उपस्थित होते ठरल्याप्रमाणे अडीच अडीच वर्षे सरपंच व उपसरपंच निवडीनुसार आज नव्यानेच जगताप पाटील बागल आघाडीचे उमेदवार परविन इमरान खान यांची नव्यानेच सरपंच पदी तर उपसरपंच पदी तनवीर शेख यांची निवड करण्यात आली यावेळी निवडीच्या दरम्यान सर्व गटाचे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते
सदरची निवड शांततेत पार पाडण्या कामी आवाटी येथील ग्रामसेवक कुलदीप दौंड पोलीस पाटील अनिल लोंढे बीट हवालदार बराटे तसेच पोलीस उपनिरीक्षक पाखरी तसेच माजी सरपंच साबीर खान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नसरुल्ला खान, विका सोसायटीचे चेअरमन राजू खान, माजी उपसरपंच संतोष सोनवर, मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गोकुळ नलावडे, दादासाहेब बंडगर तसेच जगताप पाटील व बागल गटाचे सर्व कार्यकर्ते यांनी सदरची निवड यशस्वीरित्या पार पाडण्या कामी विशेष सहकार्य केले
एकंदर पाहता आवाटी येथील नूतन निर्वाचित सरपंच व उपसरपंच च्या निवडी शांततेच्या वातावरणात पार पडले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा