Breaking

बुधवार, १५ जुलै, २०२०

माढा तालुक्यात आणखी सात कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णाची नोंद कुर्डूवाडीत कोरोनाची एन्ट्री तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 34


माढा तालुक्यात आणखी सात कोरोना  पाॅझिटीव्ह रुग्णाची नोंद 


कुर्डूवाडीत कोरोनाची एन्ट्री तालुक्यात एकूण रुग्णसंख्या ३४




माढा [प्रतिनिधी ]
माढा तालुक्यात आज सकाळी सात जणांचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. सात पैकी पाच जण आधीच्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत. तर कुर्डूवाडी शहरातील दोन जण नवीन रुग्ण आहेत. तालुक्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ही आता ३४ इतकी झाली आहे. दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

माढा तालुक्यातील सर्वात मोठे शहर व रेल्वे जंक्शन असलेल्या कुर्डूवाडी शहरात कोरोनाचा शिरकाव झाला असून यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज  रिधोरे येथिल चार, कुर्डूवाडी येथिल दोन, भोसरे येथिल एक  असा सात रुग्णांचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील एकाचा अहवाल प्रतिक्षेत असल्याचे तालुका  आरोग्य अधिकारी डाॅ.पलंगे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा