Breaking

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

अनिल कुमार,लाहोटी महाप्रबंधक मध्य रेल्वे, व डीआरएम शैलेश गुप्ता, यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन, यावेळी नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार*



*अनिल कुमार,लाहोटी महाप्रबंधक मध्य रेल्वे, व डीआरएम शैलेश गुप्ता, यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन, यावेळी नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार*


तुळजापूर प्रतिनिधी/ रुपेश डोलारे उस्मानाबाद



 आज दिनांक 30/10/21 रोजी श्री. अनिलकुमार लाहोटी, महाप्रबंधक मध्य रेल्वे व डीआरएम शैलेश गुप्ता यांनी श्री तुळजाभवानी मंदिरात कुटुंबियासह श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. सदर प्रसंगी तुळजापूर शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष सचिन रोजकरी यांनी त्यांचा यथोचित सत्कार श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासकीय इमारतीमध्ये केला.  सदर प्रसंगी नगराध्यक्ष श्री. सचिन रोचकरी यांनी सोलापूर- तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग सत्वर पूर्ण करावा याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच सदर रेल्वे चे काम सत्वर पूर्ण झाल्यास तुळजापूर शहरात येणाऱ्या भाविकांची सोय होणार असून येथील स्थानिक पुजारी व व्यापारी यांना यांचा लाभ होणार आहे.  त्यास महाप्रबंधक महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन लवकरात लवकर सदर सर्वेक्षणाचे  काम पूर्ण होईल यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले. सदर सत्कार प्रसंगी तुळजापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्‍मण राठोड, मंदिर संस्थान तहसीलदार राहुल शिंदे,मंदिर संस्थांचे कर्मचारी, तुळजापूर नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा