Breaking

शनिवार, ११ जुलै, २०२०

कुर्डूवाडी येथे सावित्रीबाई फुले महीला मंडळाच्या वतीने गरजूनां मोफत किट वाटप





कुर्डुवाडी [प्रतिनिधी ]
        कुर्डुवाडी येथील सावित्रीबाई फुले मागासवर्गीय महिला मंडळाच्या वतीने राजमंगलम व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गरजू कुटुंबियांना कौटुंबिक लागणा-या सर्व वस्तूंचे रेशनसह पूर्ण किट मोफतरित्या वाटप करण्यात आले.
      लाॅकडाऊनच्या साडेतीन महिन्यांत हातावर पोट असणाऱ्यांना कामधंद्या अभावी बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.
          सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून येथील सावित्रीबाई फुले मागासवर्गीय महिला मंडळाच्या वतीने राजमंगलम व्यसनमुक्ती केंद्रामध्ये स्वानंद सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ.किरण सुराणा भाभी यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले.
        याप्रसंगी संस्थेच्या सचिव सौ.नम्रता परिहार(ननावरे), संचालक अमोल परिहार,वर्षा ननवरे, श्रीमंत परिहार, मंगल ननवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
         सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कोरोनो काळात गरजूंना दिलेल्या मदती बद्द्ल व संस्थेच्या वतीने व्यसनमुक्तीच्या माध्यमातून चाललेल्या कार्याचे सौ.सुराणा भाभींनी विशेष कौतुक केले.गरजूंच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानण्यात आले.