*नवऱ्याला धमकावून त्याच्या पत्नीसोबत शरील संबंध ठेवल्याने जाधव यास अटक ...तीन दिवस पोलीस कोठडी*
टेंभुर्णी/ प्रतिनिधी
मोडनिंबजवळ जाधववाडी येथील एका आरोपीने मागील एक वर्षापासून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवून पतीला धमकावून जीवे मारण्याची धमकी 30 मे 2025 रोजी दुपारी दोनच्या सुमारास दिली असल्याची तक्रार टेंभुर्णी पोलीस ठाण्यात देण्यात आली. सदर आरोपीस अटक करून माडा न्यायालयात हजर केले असता 3 मे पर्यंत 2025 पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मागील जुलै 2024 चे शनिवारी दुपारी 2:30 वा. फिर्यादीचे रहाते घरी व दिनांक 30 मे 2025 रोजी मी दुपारी 2 वा.चे सुमारास फिर्यादीचे शेतातील घास गवतामध्ये यातील आरोपी योगेश महादेव जाधव रा. जाधववाडी, ता. माढा याने फिर्यादीची इच्छा नसताना फिर्यादी व फिर्यादीचे पतीला जिवे ठार मारण्याची धमकी देवुन फिर्यादीसोबत जबरदस्तीने वारंवार शरीर संबंध केले आहे.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाची टीम पाठवून यातील आरोपी नामे योगेश महादेव जाधव वय वर्ष 25 राहणार जाधववाडी, मोडनिंब, ता.माढा यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे हे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा