.
------------------------------------------
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] मुंबई हिंदू कॉलनीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर दोन माथेफिरु समाजकंटक यांनी हल्ला केल्याने संपूर्ण भारताचा श्रद्धास्थान असलेल्या या इमारतीवरील हल्ल्याचा टेंभुर्णी आर पी आय शिवसेना व विविध समाज संघटनांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पो.नि.राजकुमार केंद्रे यांच्याकडे निषेधाचे निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.
सदर समाजकंटकांना अटक करून कारवाई करावी या मागणीचे निवेदन दिले व लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. मागणीचे निवेदन आर पी आय चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार दादा वाघमारे , माढा तालुक्याचे अध्यक्ष मारुती वाघमारे, उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर खरात, आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटोळे , जिल्हा कार्य अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे , शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर अण्णा देशमुख , शहर प्रमुख सुरेश लोंढे , तात्यासाहेब खरात, वेनेगावचे पोपट लोंढे, मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागीरदार, विनायक नाईक नवरे, कैलास सातपुते सर, खिल्लारे, अमोल गायकवाड,टेंभुर्णी माजी सरपंच अनिल जगताप, राजाभाऊ खंकाळ, मिलिंद लोंढे, राहुल गायकवाड ,रमेश लोंढे, समाधान गायकवाड, रविकिरण लोंढे, अमोल खरात, सुमित खरात, लखन लोंढे, सुरज लोंढे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते