*पळसदेव अरोग्य केंद्रावर- प्रविण माने यांनी घेतली तातडीची बैठक*
*पळसदेव मध्ये सापडला १ कोरोनो रुग्न*
*aj24taas news*
*इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार*
इंदापुर [ प्रतिनिधी ] सर्व जगात थैमान घालणाऱ्या कोरोना रोगाचे संकट अजून तरी टळायचे नाव न घेता हे संकट दिवसेंदिवस अधिक गडदच होत चालले आहे. इंदापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातूनही हे रुग्ण आढळुन येत असल्याने नागरिकांच्या चिंतेच वाढ होताना दिसत आहे.
तालुक्यातील पळसदेव येथे नुकताच एक कोरोना रुग्ण आढळून आल्याने या भितीदायक वातावरणात आणखीन भर पडली असल्याचे नागरिकांतून पहावयास मिळते आहे. या साऱ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर, पळसदेव - बिजवडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य व माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रविण माने यांनी, पळसदेव आरोग्य केंद्रावर तातडीची बैठक घेतली.
आज पळसदेव येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये कोरोना आजारा विरोधातील लढ्यात असणाऱ्या सिद्धते विषयी आढावा घेतला. तसेच नागरिकांना रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या सी व्हिटॅमिनच्या गोळ्या, व आयुष्य मंत्रालयाच्या वतीने सुचविण्यात आलेल्या "आर्सेनिक अल्बम ३०" या गोळ्यांचेही वाटप करण्या संदर्भात सूचना करण्यात आल्या असून, नागरिकांनीही जागरूक राहून आपली व अापल्या कुटुंबाची सर्वतोपरी काळजी घेण्याचे आव्हान माने यांनी केले आहे.
सभोवतालची परिस्थिती पाहता, वातावरण अतिशय चिंताजनक असले तरी संकटाचे हे काळे ढग लवकरच दूर होतील व आपल्या साऱ्यांच्या प्रयत्नांना यश निश्चितच येईल असे प्रतिपादन यावेळी माने यांनी केले.
या प्रसंगी पळसदेव ग्रामपंचायत सदस्य मेघराज कुचेकर ,स्वप्निलभैय्या काळे, निलेश रंधवे, डॉ.शितल शहा, डॉ.मिलिंद यादव, व ग्रामसवेक भुजबळ साहेब व इतर आरोग्य कर्मचारी स्टाफ, व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा