*कुर्डूवाडी - आरुण कोरे*
*************************
*नगरपालिकेच्या वतीने दहा दिवस लाॅकडाऊनची जिल्हाधिका-याकडे मागणी..*
कुर्डूवाडी दि. 5 *गेल्या पंधरा दिवसांपासून कुर्डुवाडी शहराच्या सरहद्दीवरील दरवाजे ठोठावणा-या कोरोनो पाॅझिटीव्ह रुग्णांनी शहरात प्रवेश केल्याने शहरवाशीय चांगलेच हादरले आहेत.
कुर्डुवाडी शहरातील टेंभुर्णी रोडवरील साई काॅलनीत एक ३९ वर्षीय व रेल्वे वसाहतीमधील देवकते वस्तीवरील ४५ वर्षीय रेल्वे कर्मचारी यांचें रिपोर्ट कोरोनो पाॅझिटीव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
आज सकाळी हे वृत्त शहरात धडकताच आरोग्य अधिकारी डॉ.संतोष अडगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे,न.पा.आरोग्य निरीक्षक बाळासाहेब पायगण यांनी आपल्या सर्व पथकासह दोन्ही ठिकाणी जाऊन ह्या ठिकाणचा सर्व भाग चारही बाजूंनी काटे,कठड्या लाऊन सिल करण्यात आला आहे.
न.पा.तर्फे दोन्ही ठिकाणी फवारणी करण्यात आली आहे.
देवकते वस्तीवरील रेल्वे कर्मचारी संपर्कातील असून साई काॅलनीतील रुग्ण बार्शीच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केला आहे.
साई काॅलनीतील रुग्णाची सासुरवाडी बार्शी असून पत्नीच्या अपघातामुळे वाढलेली ये-जा चांगलीच महागात पडलीं आहे.
दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील लोकांची माहिती घेण्याचे काम आरोग्य खात्याने सुरू केलें आहे.त्यांना काॅरंटाईन करून त्यांचें स्वॅब उद्या घेण्यात येणार असल्याचे डॉ.अडगळे यांनी सांगितले.*
दरम्यान जिल्ह्यातील लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कुर्डुवाडी शहरांतही करण्याबाबत जनतेने आवाज उठविला.
न.पा.चे नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनी तातडीने सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे १८ते२८जुलै पर्यंत लाॅकडाऊनची पत्राद्वारे मागणी केली आहे.अन्यथा जनता कर्फू पुकारण्याचा विचार केला जात आहे.
कुर्डुवाडी शहरातील दोन रुग्णासह रिधोरे तीन, अकोले एक,भोसरे दोन असे आठ रुग्ण आढळल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पलंगे व त्यांचे पथकाने संपर्कातील लोकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
वाढत्या रुग्णांमुळे माढा तालुक्यातील आरोग्य खात्याची झोप उडाली असून नागरिकांनी अतिदक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माढा तालुक्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून वाढत्या रुग्णांच्या संख्येने सर्वांचीच झोप उडाली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा