Breaking

गुरुवार, १६ जुलै, २०२०

लक्ष्मी आनंद ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता बारावी चा 100% निकाल



लक्ष्मी आनंद ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता बारावी चा 100% निकाल.



टेंभुर्णी [प्रतिनिधी ] 

श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित लक्ष्मी - आनंद ज्युनियर कॉलेजचा आज गुरुवार दिनांक १६.०७.२०२० रोजी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परीक्षा परिषदेने दुपारी १:०० वाजता निकाल जाहीर केला.

त्यामध्ये संस्थेच्या लक्ष्मी - आनंद ज्युनिअर कॉलेजचा १००% निकाल लागला. संस्थेची १००% निकालाची परंपरा याही वर्षी कायम राहिली. संस्थेच्या सायन्स आणि कॉमर्स अशा दोन शाखा आहेत. दोन्ही शाखांतील विद्यार्थ्यांनी घवघवीत व उज्ज्वल यश संपादन केले.


 *सायन्स विभागांमध्ये खालील विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकाविले

१) कु. बोबडे साक्षी महेश - ८६.४६% प्रथम क्रमांक
२) कु. मस्के पायल विजय - ८६.३०% द्वितीय क्रमांक
३) कु. देशमुख वैष्णवी परमेश्वर - ८४.७६% तृतीय क्रमांक.

 *कॉमर्स विभागांमध्ये खालील विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकाविले

१) जठार आदित्य बळीराम - ८४.१५% प्रथम क्रमांक.
२) कु. भांगे प्रीती कृष्णा - ८२.००% द्वितीय क्रमांक
३) कोरडे ज्ञानेश्वर बिभीषण - ७८.६१% तृतीय क्रमांक

 तसेच कॉमर्स विभागातून ज्ञानेश्वर कोरडे या विद्यार्थ्याने १०० पैकी १०० गुण मिळवले

संस्थेच्या या यशस्वी वाटचालीत एच एस सी च्या १००% निकालांनी एक मानाचा तुरा रोवला आहे. म्हणून संस्थेतून, समाजातून व पालक वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संस्थेचा सन २०१९ - २० चा एच एस सी बोर्डाचा १००% निकाल लागल्यामुळे संस्थेचे चेअरमन योगेश बोबडे, सचिव सूरजा बोबडे, सनराईज गुरुकुल चे प्राचार्य  सिद्धलिंगप्पा प्रभाकर, लक्ष्मी - आनंद ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य वैभव माने, संस्थेचे समन्वयक शंकर सोनटक्के, प्री-प्राइमरी विभाग प्रमुख खुदीजा मुलाणी या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच संस्थेच्या सायन्स विभागाचा निकाल अगदी कौतुकास्पद लागल्याने व या विभागातील खालील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

क्रॉप सायन्स मध्ये ४ विद्यार्थ्यांनी २०० पैकी १९९ गुण मिळवले, तर १९ विद्यार्थ्यांनी १९० च्या पुढे गुण मिळवले आहेत.
गणित विषयांमध्ये २ विद्यार्थ्यांनी १०० पैकी ९९ गुण मिळवले.
बायोलॉजीमध्ये २ विद्यार्थ्यांनी १०० पैकी ९५ गुण मिळवले.
सर्व उत्तीर्ण झालेल्या व यश प्राप्त विद्यार्थ्यांना संस्थेतील ज्युनिअर कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वरील सर्वांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा