*सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल (गुरुकुल) १० वी चा, १००% निकाल.*
स्कूलच्या ३४ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
टेंभुर्णी [प्रतिनिधी ]दि.29
श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल (गुरुकुल) या शाखेचा इयत्ता १० वी चा सन २०१९ - २०२० चा निकाल आज बुधवार दिनांक २९-०७-२०२०रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी ठीक दुपारी १:०० वा. ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला.
त्यामध्ये संस्थेच्या सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलचा (गुरुकुल) निकाल १००% लागला. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे चेअरमन योगेश बोबडे, सचिव सुरजा बोबडे, स्कूलचे प्राचार्य सिद्धलिंगप्पा प्रभाकर, संस्थेचे समन्वयक शंकर सोनटक्के यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांचे हे यश पाहून भारावून गेलेले संस्थेचे चेअरमन योगेश बोबडे म्हणाले, २००९ साली लावलेल्या रोपट्याला गोड व रसाळ फळे येण्यास सुरुवात झाली. आणि म्हणून संस्थेचे ध्येय हे विद्यार्थ्यांचे यश प्राप्त करण्याचे गमक आहे. या यशामागे शिक्षक-पालक यांचाही मोठा हातभार आहे.
*यशप्राप्त विद्यार्थी:-*
१) विनय विकास कोठारी ९६.६०% (प्रथम क्रमांक)
२) अमरदीप राम खताळ ९५.४०% (द्वितीय क्रमांक)
३) रत्नतेज योगेश बोबडे ९४.००% (तृतीय क्रमांक)
*गणित विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण प्राप्त करणारे विद्यार्थी*
१) विनय विकास कोठारी १००/१०० (गणित)
२) अमरदीप राम खताळ १००/१०० (गणित)
शाखेच्या एकूण निकालांमध्ये ११ विद्यार्थी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून यशस्वी झाले.
विषयानुसार विज्ञान विषयात २६, गणित विषयात १८, मराठी विषयात ७, हिंदी विषयात ६, समाजशास्त्र विषयात ८ विद्यार्थी ९० पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
*मार्गदर्शक*
१) प्रा. श्री शिवाजी साठे (विज्ञान)
२) प्रा. श्री सुनील गायकवाड (गणित)
३) प्रा. श्री गणेश घाडगे (इंग्रजी)
४) प्रा. श्री बापूराव हेंबाडे (हिंदी)
५) प्रा. श्री लक्ष्मण नलावडे (मराठी)
६) प्रा. श्री. श्रीमंत लांडगे (इतिहास राज्यशास्त्र)
७) प्रा. श्री सुनील भोरेकदम (भूगोल)
संस्थेच्या या यशाबद्दल पालक वर्गातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच या यशामागे स्कूलचे सर्व शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच स्कूलच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही अभिनंदन केले.
त्याचप्रमाणे यश प्राप्त विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आला. संस्थेचे चेअरमन योगेश बोबडे, सचिव सूरजा बोबडे यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच प्रत्येक विषयात प्रथम, द्वितीय आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुणगौरव करून सत्कार करण्यात आला.
व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा