तर नाहक त्रास दिल्यास प्रति आंदोलन करण्याचा इशारा
------------------------------------------
टेंभुर्णी : - शासन मान्यता नसलेली सोलापूर जिल्हा मागासवर्गीय शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी संघटना ही टेंभुर्णीतील संस्थेविषयी व महिला मुख्याध्यापिकेच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देऊन नाहक चौकश्या करण्यास भाग पाडत आहेत.यामुळे नाहक त्रास दिल्यास भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटना प्रति आंदोलन करेल असा इशारा संघटनेचे संस्थापक भाऊसाहेब कांबळे यांनी दिला आहे.
प्रधान सचिव बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांना पाठविलेल्या निवेदनात भाऊसाहेब कांबळे यांनी म्हटले आहे की,सोलापूर जिल्हा मागासवर्गीय शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी ही संघटना टेंभुणीतील संत रोहिदास प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका संतोषी आगावणे व जय तुळजा भवानी माध्यमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री गवळी या दोन मागासवर्गीय मुख्याध्यापिकाना केवळ त्रास देण्याच्या हेतूने त्यांच्या विरोधात शासन दरबारी खोट्या तक्रारी दाखल करून संबंधित अधिकाऱ्यावर धरणे आंदोलन,उपोषण व आंदोलन करण्याचा इशारा देत दबाव तंत्राचा वापर करून चौकश्या व खोटे रिपोर्ट तयार करण्यास भाग पाडत आहेत.तसेच अधिकारी ही या दबावतंत्रास बळी पडून चौकश्या करतात.ही संघटना गेल्या अनेक वर्षांपासून या तंत्राचा वापर करून महिला मुख्याध्यापिकांना त्रास देत आहेत.यापुढे या दबाव तंत्राचा वापर करून नाहक त्रास दिल्यास भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोस संघटनेतर्फे प्रति आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा