*बार्शीचा कोरोनोची कुर्डुवाडीसह माढा तालुक्यात घुसखोरी...*
*आरोग्य खात्याच्या दक्षतेने पाच दिवसांत साखळी कोरोनोची खंडीत...*
*कुर्डुवाडी प्रतिनिधी आरुण कोरे*
------------------------------------------
*aj24taas news*
*कुर्डुवाडी शहरात कोरोनोचे रुग्ण आढळले असले तरी त्याची उत्पत्ती येथील नाही.सोलापूर नंतर बार्शी शहर जिल्ह्यातील एक नंबरवर पोहचले तेथूनच कुर्डुवाडीत व तालुक्यात शिरकाव झालेला आहे.*
*शिवाजी चौक,साई काॅलनीतील, रुग्णाच्याघरातील सर्वजण निगेटिव्ह निघाले आहेत. रेल्वे काॅलनी वरील देवकते वस्तीवरील एकमेव रुग्णाच्या संपर्कातील सर्वजण निगेटिव्ह आहेत.*
*टेंभुर्णी रोडवरील साईकाॅलनी, चौधरी प्लाॅट, थिएटर परिसर येथे जरी संपर्कातील काही मोजके रुग्ण सापडले असले तरी त्याची साखळी आरोग्य खात्याच्या अती दक्षतेने व शहरवासीयांच्या सुदैवाने रॅपिड अॅन्टीजेन टेस्टने दुसऱ्याच दिवशी तुटली आहे.रिधोरे वगळता तालुक्याचीही साखळी खंडीत झाली ही समाधानाची बाब आहे.*
*विशेष म्हणजे माढा रोडवरील अडीच वर्षीय चिमुकलीला बाधा झाली..ना ना.. वावड्या उठल्या. पण तिची आरोग्य खात्याने व तिच्या कुटुंबीयांनी घेतलेली काळजी तसेच दहा दिवसांत कोरोनोवर मात करून घरवापसी सर्वांनाच प्रेरणा देऊन आत्मबल वाढवणारी ठरली.*
*शहरवासीयच मास्क न वापरणे, नियमांचे काटेकोरपणे पालन कटाक्षाने करत नसल्याने नाईलाजाने सर्वांच्या आरोग्य रक्षणासाठी आज सोमवारपासून "जनता कर्फू" पुकारावा लागला.त्याला बेजबाबदार वागणारेच जबाबदार आहेत.*
*कुर्डुवाडी शहराच्या सर्व वेशीवरील दार ठोठावत कानावरून गेले आहे.सावधानता व दक्षता बाळगली नाही तर काळ कदापी माफ करणार नाही.*
*बेजबाबदार नागरिकांनी विशेषतः तरुण पिढीने भविष्यात कारणाशिवाय घराबाहेर पडण्याचे टाळले व सुदैवाने बार्शीसारखी साखळी न वाढल्याने,ती खंडीत झाल्याने जनता कर्फूवर, होऊन कालखंड कमी केला जाऊ शकतो.*
*गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात गुटखा,मावा आदी तंबाखू जन्य वस्तूंची दारुंची खात्याच्या आशिर्वादाने बेकायदेशीरपणे राजरोसपणे विक्री सुरू आहे.*
*विशेष बाब म्हणजे टेंभुर्णी रोडवर रहाणा-या पोलिस अधिका-यांच्या घरासमोरच खुलेआम गुटखा- मावा विकला जातोय त्याकडे कानाडोळा करुन करोडोंची माया कोणी कोणी जमवली जातेय याबाबतही नागरिकांमध्ये तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.*
*याबाबत चौकशी केली असता डिपार्टमेंटच्याच निम्म्याहून अधिक स्टाफलाच गुटखा-माव्या तलफेशिवाय दिवसच जात नसल्याचे गुटखा विक्री करणारे व डिपार्टमेंटचे बांधवच सांगतात.*
*माढा तालुक्यात पोलिस, आरोग्य,न.पा.व महसूल खात्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसतानाही त्यांनी त्यांच्या हिकमतीने शहर अजूनही सुरक्षीत ठेवले आहे. ही खरीच अभिमानास्पद व अभिनंदनीय बाब आहे.नाव ठेवणें,दोष काढणं सोपं आहे.प्रत्यक्ष रात्रीचा दिवस करणाऱ्याला माहीत असतं कामाची जोखीम काय असते*
*कुर्डुवाडी न.पा.आरोग्य निरिक्षक तुकाराम पायगण त्यांचे सर्व आरोग्य कर्मचारी व स्टाफ यांनी ठेवलेले स्वच्छ शहर, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संतोष अडगळे यांचें पथक,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत पलंगे व त्याची तालुक्यातील पथके, सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे व पोलीस बांधव यांची तत्परतेने परिस्थितीवर मार्ग काढण्याची हातोटी खरेच वाखाणण्याजोगी आहे.*
*विशेष म्हणजे या सर्वांवर अधिकारशाही न गाजवता प्रांत अधिकारी ज्योतीताई कदम, पोलिस उपअधीक्षक विशाल हिरे, नुकतेच बदलून गेलेले मुख्याधिकारी कैलास गावडे, तहसीलदार राजेश चव्हाण,बिडीओ.संताजी पाटील यांनी कुर्डुवाडी शहरं व तालुका डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करुन सर्वांचीच सुरक्षितता जपत आहेत.त्यांच्या सुचनाप्रमाणे फक्त आपल्याला वागायचं आहे.*
*सोलापूर जिल्ह्यात बार्शीने उच्चांक गाठलाय.मोहोळ, करमाळा,पंढरपूर शहरात परिस्थती बिघडत आहे.तेथील परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत जाणे टाळून आपली सुरक्षितता आपणच करु शकतो.*
*तुर्तास एवढेंच करून कोरोनोला पळवायला "कुर्डुवाडी-माढा पॅटर्न"ही लांब नाही.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा