Breaking

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

*सहकारातील" डॉक्टर गुरू" अनंतात विलीन आ.बबनदादा शिंदे*




***भावपुर्ण   श्रद्धांजली **********




*सहकारातील" डॉक्टर  गुरू" अनंतात विलीन आ.बबनदादा शिंदे*
                                                             
आ बबनदादानी वाहीली भावपुर्ण श्रद्धांजली 

बेंबळे दि. 18

 सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकारणी व्यक्तिमत्व व मागील पन्नास वर्षापासून सामाजिक, राजकीय व सरकारी क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक गुरु व सहकाराची ज्ञान पंढरी म्हणून परिचित असलेले श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांच्या दुःखद निधनाचे वृत्त आज समजले, आणि मन सुन्न झाले. आसल्याच्या  आ.बबनदादा शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या 

ते पुढे बोलतांना म्हणाले की जिल्ह्यामध्ये कोणत्याही बंद पडलेल्या सहकारी संस्था किंवा साखर कारखाने पुन्हा उभ्या करून त्या यशस्वी चालवून दाखवण्याचे कसब  त्यांच्याकडे होते म्हणून त्यांना सहकारातील डॉक्टर म्हणून ओळखले जात आसल्याने सांगीतले 
 तोट्यात चालणार्या एस टी महा मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारून ते यशस्वीरित्या चालवून पुन्हा नफ्यात आणून दाखविण्याची किमया  त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली. सुधाकरपंत परिचारक हे अनेक वर्ष खासदार शरद पवार यांच्यासोबतही काम करत राहिले . सोलापूर जिल्ह्याच्या विकास कार्यात आम्ही मिळूनच एकत्र काम केले.  पंतांच्या निधनाने जिल्हा एका जेष्ठ ऋषितुल्य, लोकप्रिय व आदरणीय राजकीय नेत्याला मुकला आहे. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.  देशपातळी, राज्यपातळी व जिल्हा पातळीवरील अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ राजकीय व्यक्तींनी पंढरीनगरीतील " पंतांच्या वाड्याला "भेटी दिल्या ,तो' वाडा 'आता  पंतांच्या जाण्याने शोकसागरात बुडाला आहे.परिचारक कुटुंबियांच्या दुःखात आम्ही शिंदे कुटुंबीय मनःपूर्वक सामील आहोत .
             शिंदे कुटुंबीय व माढा विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने स्वर्गीय  सुधाकरपंत परीचारक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.  त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व सद्गती 
 हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आ. बबनराव शिंदे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा