Breaking

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

*टेंभुर्णी जवळ चालकांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करून लुटणाऱ्या पाच अटल दरोडेखोरांना आटक*

.


*टेंभुर्णी जवळ  चालकांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करून लुटणाऱ्या पाच अटल दरोडेखोरांना आटक*
------------------------------------------ 

टेंभुर्णी [प्रतिनिधी ] सोलापूर-पुणे महामार्गावर मालट्रक चालकांना चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाण करून लुटणाऱ्या अटल पाच दरोडे खोरांना  त्यांच्याकडील दोन (स्विफ्ट) कारसह टेंभुर्णी पोलिसांनी सापळा रचून पकडून अटक केल्याची माहिती करमाळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे व पोनि राजकुमार केंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत अधिक माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे व पोनि राजकुमार केंद्रे यांनी सांगितले की,गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर-पुणे महामार्गावर छोटे-मोठे गुन्हे घडत होते.मात्र किरकोळ तक्रारी असल्याने अथवा नको ती कटकट म्हणून मालट्रक चालक गन्हे दाखल करीत नव्हते.याचा गैरफायदा घेऊन चक्क कार गाड्यातुन दरोडे टाकणाऱ्या टोळ्यातील तरुणांची संख्या वाढू लागली होती.यामुळे पोलिसांनी महामार्गावर गस्त वाढविली होती.दरम्यान सोलापूर-पुणे महामार्गावर शनिवारी मध्यरात्री नंतर ०१ वा.सुमारास वरवडे टोल नाक्याच्या पश्चिमेस दोन कि.मी.अंतरावर मालट्रक चालक अनिस वशारद उल्ला (वय-३०,रा.फेनहा,पो.कापा. ता.पट्टी.जि.प्रतापगड,उत्तरप्रदेश) हा त्याच्या कडील मालट्रकमध्ये (क्र-यु.पी-७०-जि.टी-७३५३)झाडे घेऊन हैद्राबाद येथे आला होता.तेथून तो सांगोला येथे रिकामा गेला व तेथून २९ रोजी रात्री डाळींब घेऊन उर्वरित डाळींब माल घेण्यासाठी तो महामार्गावरील माढा तालुक्यातील भुईंजे येथील मार्केट मध्ये निघाला होता.
तो वरवडे टोल नाका येथून वळून येत असताना अंधारामुळे चालक रस्ता चुकल्याने त्याने ट्रक साईडला घेऊन मॅनेजरला मोबाईलवरून रस्ता विचारत होता.त्याने समोर थांबलेल्या कार (क्र-एम.एच-०४ डी.एफ.७५१७) यामधील लोकांना ही रस्ता विचारल्यावर त्यांनी तो बरोबर असल्याचे सांगितले.तो निघणार एवढ्यात त्याच कार मधून चारजण उतरून आले व दोघे-दोघे जन मिळून चालकाचा बाजूने व क्लिनरच्या बाजूने ट्रकमध्ये बळजबरीने घुसले.तर एकजण कार जवळ थांबला.त्यांनी चालक क्लिनर यांना मारहाण करून जखमी केले.तसेच चालकाचा गळ्यास चाकु लावून त्याच्या खिशातून ३८ हजार रोख,पाच हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ४३ हजार रुपयांचा ऐवज घेऊन ते कारमध्ये बसून निघून गेले.

ही घटना घडताच चालक अनिस उल्ला याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.यानंतर पोलिसांनी रात्रीतून या कारचा व आरोपींचा शोध घेऊन रोहन देविदास ढवळे (वय-२४)रणजित बलभीम ढवळे (वय-२३)महादेव विठ्ठल ढवळे (वय-२४) तिघे रा.दगड अकोले,ता.माढा.सोहम विठ्ठल मस्के (वय-२०) रा.शेवरे ता.माढा. व सूरज तुकाराम महाडिक (वय-१९) रा.माळेगाव ता.माढा.यांना पहाटेच्या सुमारास दगड अकोले शिवारातील कॅनॉल च्या पुलाजवळ दडून बसलेले असताना पकडून अटक केली.
तसेच ते दोन कार मधून फिरत असलेल्या त्यांच्या कार (क्र-एम.एच-०४ई.एफ-३६९३) व कार (क्र-एम.एच-०४-डी.एफ-७५१७) या दोन कार ही जप्त केल्या.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राजकुमार केंद्रे,सपोफौ.अशोक बाबर,पोहेकॉ राजेंद्र डांगे,पोना दत्ता वजाळे,पोना राजेंद्र ठोंबरे,पोना धनाजी शेळके यांनी पार पाडली.
महामार्गावर सतत मालट्रक चालकांना लुटणाऱ्या तरुणांच्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत.याची माहिती पोलिसांना मिळाली होती.यामुळे पोलीस या टोळ्यांच्या मागावर होते.पण या टोळक्यांना सावज सापडत नव्हते.पोलिसांना टोळी पकडायची होती.तर या टोळक्यांना दरोडा टाकायचा होता.यामुळे पोलीस तीन-चार दिवसापासून महामार्गावर पाळत ठेवून होते.मात्र गुन्हेगार सतत सतत तीन दिवस हुलकावणी देत होते.मात्र शेवटी गुन्हा घडताच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्याच.या गुन्ह्याचा अधिक तपास पोनि राजकुमार केंद्रे हे करीत आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा