*माढा तालुक्यात रयत क्रांती संघटनेच्यावतीने श्रीराम मंदिर भूमीपूजन उत्सव साजरा*
------------------------------------------
टेंभूर्णी (प्रतिनिधी ) *aj24taas news*
माढा तालुक्यातील उजनी (टें) येथे रयत क्रांती संघटनेच्यावतीने श्रीराम मंदिर भूमिपूजन उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी मिठाईचे वाटप करण्यात आल्याची माहीती राज्य कृषी मूल्य आयोगाचे मा सदस्स प्रा सुहास पाटील यांनी दिली.गेल्या ५०० वर्षापासुन श्रीराम मंदिराचा प्रश्न प्रलंबित होता.श्रीरामजन्म भूमी मंदिराचा प्रश्न न्यायालयाने निकालात काढला.आजच्या दिनी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचे हस्ते आयोध्येमध्ये मंदिर भूमीपुजनाचा कार्यक्रम होत आहे.याचेच औचित्य साधुन तालुक्यामध्ये रयत क्रांती संघटनेच्या वतीने हा ऊत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. घरावर मांगल्याची गुढी उभारण्यात आली व सर्वांना मिठाई वाटून राम जन्मभूमी पुजनाचा उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे मा सदस्स तथा रयत क्रांती संघटनेचे जिल्हा समन्वयक प्रा सुहास पाटील,खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेश पाटील,ज्ञानदेव माऊली पाठक,बाबासाहेब पानबुडे,अमोल जाधव,परशुराम नवले,धवल पाटील,मेघराज पाटील,हरीदास कवडे,आजीनाथ गायकवाड,विश्वजीत पाटील,यशराज पाटील,बापु कवडे,दादा गवळी,सिद्धेश्वर लोंढे,सचिन जगताप,विश्वतेज पाटील आदीजण उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा