
विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे ऊस विकास अधिकारी भादुले यांचे कोरोनाच्या भितीने निधन
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे मुख्य ऊस विकास अधिकारी महेश भादूले (वय-52 ) रा. पंढरपूर यांचे आज पहाटे निधन झाले..
ते माढा तालुक्यातील टेंभुर्णी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि.पिंपळनेर येथे गेल्या सहा ते सात वर्षा पासून मुख्य ऊस विकास आधिकारी म्हणून कार्यरत होते. ते आजारी पडल्याने त्यांना पंढरपूर येथिल खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार साठी दाखल केले होते.उपचार सुरू असताना त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याने ते घाबरून गेल्याने त्यातच त्यांचे निधन झाले.
यापूर्वी त्यांनी माळशिरस,पंढरपूर या ठिकाणी ऊस कारखान्यात विकास अधिकारी म्हणून काम पाहिले होते.अनेक लोकांशी थेट संपर्क असायचा.यामुळे
शेतकऱ्यांतुन हळहळ व्यक होत आहे.
******************************* * ***********
************* *जाहीरात* **************
********* *भावपुर्णश्रद्धांजली* ******************
********जाहीरतीसाठी संपर्क करा मो. 9921581001*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा