*भाजप नेते शंभूराजे जगताप यांची जातेगाव परिसरातील अतिवृष्टी बधितांना भेट*
*अतुल वारे पाटील - करमाळा*
करमाळा भाजपचे नेते शंभूराजे जगताप यांनी जातेगाव परिसरातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची भेट घेतली.
शेतकाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली तसेच बाधित शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.करमाळा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व ऊस,केळी, मका, कांदा, तूर उत्पादक शेतकऱ्यांना तालुक्याचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप, माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब धुमाळ, रयत क्रांती संघटना तालुका उपाध्यक्ष दीपक शिंदे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष अमोल घुमरे,अतुल शिंदे,पप्पू पाटील,भाऊसाहेब गाढवे,राजेन्द्र घुमरे, शिवाजी माने,बलभीम आरणे, पुरुषोत्तम माने,अजिनाथ घुले,बिभीषण निकम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा