बेंबळेत पोलिस हल्ला प्रकरणी सात जणांना पोलीस कोठडी
*AJ 24 Taas News Maharashtra
टेंभुर्णी : - माढा तालुक्यातील बेंबळे येथे अपहरणाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या धाडगाव जि.नंदुरबार येथील पोलीस पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना सात जणांनी दगडांनी,हातानी मारहाण करीत अश्लील शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला.याप्रकरणी बेंबळे येथील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक सर्व सातजणांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.तर मुख्य आरोपी पांडुरंगनवनाथ हुलगे हा फरार झाला आहे.
आकाश यशवंत खडके (वय-२४) रा.चव्हाणवाडी,सुरेश दत्तात्रय गोडसे (वय-३२),उत्तम गोवर्धन काळे-(वय-३२),वैभव सिद्धेश्वर ठाकरे (वय-२४),सोमनाथ धोंडीराम हुलगे (वय-३३),अशोक महादेव धायगुडे (वय-२६),गौतम गोवर्धन काळे-(वय-३१),सहाजण रा.बेंबळे,ता.माढा अशी पोलीस कोठडी सूनवलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,बेंबळे येथील पांडुरंग नवनाथ हुलगे याच्यावर देलसिंग माकत्या वळवी (वय-२६) रा. गारब्यांचा पाटील-पाडा,धाडगाव नंदुरबार या ऊसतोडणी मुकादमास कोंडून ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण करून पळून आणल्याचा गुन्हा धाडगाव पोलीस ठाण्यात १९ ऑक्टोबर रोजी दाखल झाला होता.त्या अनुषंगाने धाडगाव पोलीस ठाण्यातील पोसई सुरेश भिमराव सोनवणे व पोकॉ बेलेकर,पोकॉ समाधान केंद्रे,पोकॉ महाजन असे वरिष्ठांच्या आदेशाने तपास करण्यासाठी माढा तालुक्यातील बेंबळे येथे खाजगी वाहनाने आले होते.ते २१ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वा.बेंबळे येथे पोहचले होते.ते आरोपी पांडुरंग हुलगे यांच्या तपासासाठी मोबाईल लोकेशनचा दिशेने कच्च्या रस्त्याने निघाले होते.समाधान केंद्रे हे पोलीस गणवेशात होते.दु.०२ वा.सुमारास समोरून दोघे मोटरसायकलवर येताना दिसले.त्यात पांडुरंग हुलगे असल्याचे लक्षात येताच पोकॉ केंद्र यांनी त्यास थांबून नाव-गाव विचारले असता त्याने पांडुरंग हुलगे सांगितले.यावेळी पोलिसांनी त्यास धाडगाव पोलीस ठाण्यात तुमच्या विरोधात हेलसिंग मागत्या वळवी यास पळवून आणल्याचा गुन्हा दाखल असून त्यासाठी आपण टेंभुर्णी पोलीस स्टेशनला चला असे म्हणताच तो मोटारसायकल फेकून देऊन पळू लागला.पळता पळता तो दगड धोंड्यात पडल्याने त्याच्या पायास,पायाच्या दोन्ही अंगठ्यास व गुडघ्यास लागले.तेवढ्यात इतरांनी त्याच्याबरोबर आलेल्या दुसऱ्या इसमास धरून ठेवले.या दरम्यान तेथे दुसरा एक जण आला.त्याने पांडूला मारताहेत असे गावात सांगून सहा-सात जणाना त्वरेने बोलावून घेतले.ते सर्वजण पोलीस पथकास मारण्यासाठी अंगावर धावून आले व तुम्ही पांडूला सोडले नाही तर दगडाने येथेच ठेचून काढू असे म्हणून त्यांनी हाताने बुक्क्यांनी मारहाण सुरू केली.व पकडलेल्या आरोपीस पळवून लावले,घेराव घातला.झटापट सुरू असताना टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोनि राजकुमार केंद्रे व पोलीस कर्मचारी तेथे आले.
यानंतर त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका करून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आणले.तेथे पोसई सुरेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून बेंबळे येथील अनोळखी सात जणांच्या विरोधात तपास करण्यासाठी आलेल्या पोलीस पथकातील पोलीस कर्मचाऱ्यास शासकीय काम करताना मारहाण,शिवीगाळ,दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोनि राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली
सपोनि सुशील भोसले हे अधिक तपास करीत आहेत.
चौकट : -
बेंबळेत धाडगाव जि.नंदुरबार येथील पोलिसांनी गोळीबार केल्याच्या जोरदार अफवा पसरल्या होत्या मात्र गोळीबाराची
ही शक्यता टेंभुर्णी पोलिसांनी नाकारली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा