Breaking

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

उंदरगाव शिवारात शेतातील पाईपलाईनची मोडतोड अज्ञात इसमा विरुद्ध तक्रार दाखल**



*करमाळा तालुका प्रतिनीधी -अतुल वारे पाटील*

      उंदरगाव ता करमाळा शिवारात शेतातील ठिबक सिंचन पाईपची अज्ञात व्यक्तीने जागोजागी दगड घालून मोडतोड केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला असून यामुळे लाखो रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.सध्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असतानाच काही विकृत प्रवृत्तीच्या अज्ञात इसमांनी असे नुकसान केल्याने परिसरामध्ये दहशत पसरली आहे.
          याबाबत माहिती अशी की वैशाली गोडगे यांच्या उंदरगाव शिवारातील शेती गट नंबर ३८/१/ब मधील शेती मध्ये उघडे पीव्हीसी पाईप टाकून ठिबक सिंचन केले आहे यामधील पाईप, टी, व ठिबक चे लॅटर अज्ञात इसमानी दगडाने तोड फोड करून नुकसान केले आहे, यामध्ये पंचवीस पाईपची मोडतोड तसेच इतर नुकसान केले आहे दुसऱ्या दिवशी गोडगे या शेतात गेल्यावर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना हे पाहून धक्काच बसला यानंतर हा प्रकार इतर लोकांना सांगून अज्ञात इसमांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला यानुसार तक्रार देण्यात आली आहे.सदर प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपीला अटक करण्याची मागणी गोडगे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा