टेंभुर्णी येथील धान्य गोडाऊन मधील हमालांचा लॉकडाउन काळातील पाच महिन्याचा पगार नाही.....
पगाराची रक्कम सात ते आठ लाख रुपये।।
... हमाल कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ।।
बेंबळे। प्रतिनिधी
कोरोना महामारी च्या संकटकाळात एप्रिल 20 ते ऑगस्ट 20 पर्यंत पाच महिन्यात टेंभुर्णी धान्य गोदामातुन गावोगावी धान्य पुरवठा करण्यासाठी हमाली केलेल्या मजूर कामगारांचा पाच महिन्याचा किमान सात ते आठ लाख रुपयांचा पगार, ठेकेदाराच्या बेफिकीर वर्तनामुळे अद्याप पर्यंत मिळाला नाही, त्यामुळे या हमाल मजुरांच्या कुटुंबियांच्यावर, दिपावली सारख्या सणासुदीच्या काळात उपासमारीची पाळी आली आहे. याबाबत या मजूर कामगारांनी आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय मामा शिंदे यांचे मार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी श्री कारंडे यांना कळवले आहे व आमदारांनीदेखील दोन तीन वेळा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना या मजुरांच्या पगाराबाबत तातडीने निर्णय घेण्यास कळवले असून देखील सध्या त्यांचा फारसा काही परिणाम झालेला नाही. या सर्व सद्यपरिस्थिती मुळे या मजुरांची अवस्था ...जगावे की मरावे...अशी झाली आहे.
सविस्तर वृत्तांत असा की माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील धान्य गोदामातून परिसरातील बेंबळे, पिंपळनेर, शेवरे, चांदज ,आढेगाव इत्यादी सहीत त्रेचाळीस धान्य दुकानदारांना त्यांच्या गावातील स्वस्त धान्य दुकानापर्यंत गहू तांदूळ व इतर विक्रीसाठी येणाय्रा मालाच्या गोण्या वाहनातून पुरवण्यात येतात. धान्याच्या गोण्या वाहनात ठेवणे ,गावोगावी जाऊन तेथील धान्य दुकानात गोण्या उतरून देणे, हे काम हमाल मंजूर करतात व यांचा पगार ठेकेदार करत असतो. याप्रमाणे संतोष जनार्दन नवले, तानाजी पांडुरंग मुळे ,भैरु देविदास शिंदे ,महादेव लक्ष्मण लांडगे ,नवनाथ वामन तनपुरे,राजा हरीदास कोरडे, कुंडलिक राजाराम कीर्ते व सोमनाथ पांडुरंग पवार या हमाल मजुरांनी एप्रिल 20 ते ऑगस्ट 20 पर्यंत लाँकडाउनच्या अत्यंत कडक अंमलबजावणीच्या काळात गोडावूनमधून धान्यपुरवठा करण्याचे काम केले आहे., या सर्वांच्या पाच महिन्याच्या पगाराची रक्कम सात ते आठ लाख रुपयापर्यंत आहे, व ही पगाराची रक्कम ठेकेदाराच्या नियमबाह्य दुर्लक्षित चुकांमुळे व बेफिकीर वृत्ती मुळे मिळत नाही असे दिसून येते असे समजते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी व आमचे पैसे दिपावली सणापूर्वी आम्हाला मिळावे अन्यथा आमच्या कुटुंबियांच्या उपासमारीला सीमाच राहणार नाही असे यांचे रास्त व स्पष्ट म्हणणे आहे., तसेच संबंधित ठेकेदाराला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ते शासन सुद्धा द्यावे अशी मागणी होत आहे.
**********************************************
.... AJ 24 Taas News प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की......
लाँकडाउन मध्ये काम केलेल्या टेंभुर्णी गोडाऊन मधील मजुरांच्या थकित पगारा संदर्भात मी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे बरोबर चर्चा केलेली आहे. लवकरच त्यातून तोडगा निघेल व संबंधित मजुर हमालांना लवकरात लवकर पगार कसा मिळेल या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत.
राजेश चव्हाण , तहसीलदार, माढा .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा