बेंबळे येथे शासनाच्या आदेशाचे पालन करीत शाळेची घंटा वाजली...
फोटो
सज्जन शिंदे
बेंबळे प्रतिनिधी:- राज्य सरकारच्या परवानगीनंतर राज्याच्या ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयं आजपासून सुरु झाली आहेत. बेंबळे येथिल विमलेश्वर विद्यालयात तब्बल आठ महिन्यानंतर शासनाच्या आदेशाचे पालन करीत शाळेची घंटा वाजली. इयत्ता नववी आणि बारावीच्या वर्गांना सुरुवात विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्रे घेऊन करण्यात आली. विद्यालयात प्रवेश करताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करीत प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्कॅनिंग, अॉक्सिजन पातळी तपासणी, सॅनिटायझर तसेच मास्कचा वापर करत विद्यार्थ्याला वर्गात प्रवेश देण्यात आला. शाळेचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला होता. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्यांच्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझरच्या बॉटल ठेवण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्स मेन्टेन करण्यासाठी एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्यात आला होता. विमलेश्वर विद्यालयातील सर्व २१
शिक्षकांची covid-19 ची चाचणी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये सर्व शिक्षक हे निगेटिव्ह आहेत. एकंदरीत या विद्यालयात लॉकडाऊननंतरची शाळा उघडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात असली तरी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद दिसून आला यावरून पालकांची विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची मानसिक तयारी झाली नसल्याचे चित्र आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा