*तुळजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने आमदार कैलास पाटील यांचा सत्कार*
उस्मानाबाद(प्रतिनिधी) : प्रतिक भोसले
राज्य पंचायतराज समिती सदस्य (पीआरसी) तसेच जिल्हा नियोजन समिती उस्मानाबाद कार्यकारी समितीमध्ये विशेष निमंत्रीत सदस्य म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास(दादा)पाटील यांची निवड झाल्याबद्दल तुळजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने यथोच्छित सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार कैलास (दादा) पाटील यांनी बोलताना सांगितले की, येणाऱ्या काळात तुळजापूर तालुक्यात माझा महाराष्ट्र भगवा, महाराष्ट्र या अभियानांतर्गत गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक तसेच तालुकाभर शिवसेना सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणार आहे असे सांगितले. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण, शिवसेना सोशल मिडीया तालुका प्रमुख चेतन बंडगर, सिंदफळ सोशल मिडीया विभाग प्रमुख सिद्राम कारभारी, बालाजी पांचाळ, विनोद दुपारगुडे, कुमार साखरे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा