Breaking

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०

*पंढरपूरचे आ. भारत भालके यांचे दुःखद निधन*पंढरपुर तालुक्याला तिसरा मोठा धक्का*




*पंढरपूरचे आ. भारत भालके यांचे दुःखद निधन*पंढरपुर तालुक्याला तिसरा मोठा धक्का*
AJ 24 Taas News Maharashtra
*पंढरपूर /प्रतिनिधी*

सोलापूर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रांमधील राष्ट्रवादीला पहिला झटका राजा बापू पाटील गेल्याने झाला तर काही दिवसापूर्वी सुधाकरपंत गेल्याने पंढरपूर तालुक्यातील दोघे गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली होती
तोपर्यंत पुन्हा पंढरपूर तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजाचा वाघ म्हणून ओळखला जाणारा आमदार भालके यांची आज दुःख निधन झाल्याने पंढरपुर तालुक्याला तिसरा मोठा धक्का बसला आहे.
 आमदार भालके यांना 30 ऑक्‍टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 
उपचार करून बरे होऊन भालके घरीही गेले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. त्यानंतर पुन्हा त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पुण्यातील रूबी हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते 
नानांच्या उत्तम प्रकृती स्वास्थ्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. सर्वत्र त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना सुरू होत्या.  परंतु अखेर नियती कठोर झाली आणि सर्वसामान्यांच्या हृदयसिंहासनावर आरूढ झालेल्या या स्वाभिमानी नेत्याने आज रात्री अखेर आपली इहलोकीची यात्रा संपवली. वयाच्या 62 वर्षी त्यांचे अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.
भालके यांच्या विठ्ठल कारखान्याचे काही संचालक, अधिकारी आणि कामगारांनाही कोरोनाची लागण झाली होती. तत्पूर्वी गेल्या वर्षी बंद असलेला कारखाना सुरू व्हावा आणि शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप व्हावे, यासाठी आमदार भालके यांनी मोठे परिश्रम घेतले होते.
त्यांनी फक्त आपलाच कारखाना सुरू केला नाही तर विठ्ठल परिवारातील टाकळी सिकंदर येथील माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भीमा आणि कल्याणराव काळे यांचा साखर कारखाना सुरू करण्यासाठी मदत करावी, असा आग्रह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धरला होता.
आज त्यांच्या अचानक जाण्याने पंढरपूर तालुक्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची खुप मोठी हानी झालीय. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा