Breaking

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

कुर्डुवाडी नगरपालीका व वीज वितरणच्या अंदाधुंदी कारभारात दोन महिन्यांपासून शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात...


*
कुर्डुवाडी नगरपालीका व वीज वितरणच्या अंदाधुंदी कारभारात दोन महिन्यांपासून शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात...



कुर्डूवाडी प्रतिनिधी अरुण कोरे

वीज मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंधारी कारभारा विरोधात नागरिकांत तिव्र संताप...*अखेरीस पोलीस स्टेशनला तक्रार दाखल..ज्येष्ठ नागरिकानेच दिला आत्मदहनाचा इशारा..महिनाभरापासून सेकंदाला वीजेचा चालू-बंद लपंडाव चालूच..पोलिस खात्याचेही हात वर...*
 

      *कुर्डुवाडी शहरातील सिध्देश्वर नगर मधील कोरे प्लाॅट्सलाईनला  मुख्य वीज वाहीनीची भर रस्त्यावरील तार तुटून महिना उलटून गेला आहे.त्याविरुध्द कुर्डुवाडी नगरपालीका व वीज वितरणच्या अधिका-यांना सांगूनही दोघेही जबाबदारी एकमेकांवर गेल्या दोन महिन्यांपासून टोलवत असल्याने शेंकडों नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे.*
       *वीज मंडळाच्या गलथाण कारभाराबाबत वीज मंडळाचे उपअभियंता श्री.कानगुडे यांना सांगितले तर ते म्हणतात नगरपालीकेने आम्हाला कळविले तर आम्ही काम करणार अन्यथा नाही.*
     *नगरपालिकेचे वीज विभागाचे कर्मचारी श्री..शिवशरण यांना सांगितले तर ते म्हणतात नगरपालीकेने वीज वितरणच्या अधिका-यांना सांगितले आहे.ते काम त्यांचें आहे.*
       *या दोघांच्या भांडणात शेंकडों नागरिक मात्र जीव मुठीत धरून जगत आहेत.*
      *तत्पुर्वी पंधरा दिवस वीजांच्या तारांच्या स्फोटाने गल्ली पंधरा दिवस हादरत होती.भर पावसाळ्यात वीज तारांच्या घर्षणामुळे रात्रंदिवस लखलखाट अद्यापही सुरूच आहे.याचा फटका ग्राहकांना बसूनअनेक वीजेची उपकरणेही घरोघरी जळून ग्राहकांचे नुकसान झाले.*
       *नगरपालीका दखल घेईना म्हणून अधिकारींना दूरध्वनी करून संपर्क केला असता तेही फोन उचलत नाहीत.*
    *स्थानीक पातळीवर कुणीही या गंभीर घटनेची दखल घेईनात म्हणून ज्येष्ठ नागरिक अरुण कोरे (पत्रकार) यांनी वीज वितरणच्या मुंबईच्या कार्यालयाला आॅनलाईन तातडीची तक्रार १२आक्टोंबर रोजी नोंदवली.*
       *दरम्यान १३आक्टोंबर रोजी रात्री साडे आठ वाजता वीज बंद करून वीज वितरणाचे दोन वायरमन,झिरो वायरमन आदींनी अंधारात कोरे यांच्या कंपाऊंडच्या भिंतीवर चढून पोहचणा-या हातापर्यत वायर अर्धवट तोडून शिविगाळ करत अंधारात पलायन केले.*
      *त्यानंतर गेले २६ दिवस सर्वांशी संवाद व संपर्क ठेऊनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने अखेर नागरिकांच्या जीवीताला धोक्याबाबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावयास गेले असता त्यांनीही हात वर केले.*
      *अखेरीस घडलेल्या घटनेबाबत महत्प्रयासाने ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे यांनी तक्रार दाखल केली आहे.त्याचा तपास हेड कॉन्स्टेबल सहदेव जगदाळे करीत आहेत.*
     *वीज मंडळाच्या मुंबई कार्यालयाने बार्शी, कुर्डुवाडी कार्यालयास वारंवार कळवूनही घोडे कुठे पेंड खातय तेंही कळून येईना म्हणून अरुण कोरे यांनी आॅनलाईन लोबणा-या वीज वाहीनीला पकडून आत्मदहनाचा इशारा दिला आहे.*
   *नागरिकांच्या वतीने तक्रारदार ज्येष्ठ नागरिक व पत्रकारास त्रास देण्याच्या उद्देशाने तर हा लपंडाव चालू नाही ना अशीही संतप्त नागरिकांत प्रतिक्रिया उमटत आहेत.*
       *वीज वितरण,नगरपालीका व पोलीस खाते संतप्त नागरिकांच्या घडणा-या दुर्घटनेस जबाबदार राहतील अशी समजही देण्यात आली असून त्यांचें डोळे किती जणांचे प्राण घैतल्यावर उघडणार हे आता काळ व कामांवर अवलंबून असून नागरिक तोपर्यंत वीजेच्या लपंडावात जीव मुठीत धरून जगत आहेत.*

       *

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा