*उदगीर रेल्वेस्थानकावर मालधक्का उभारणीस मंजूरी!*
AJ 24 Taas News Maharashtra
*लातुर जिल्हा प्रतिनिधि--- जीवन भोसले* मो. 9422811817
*उदगीर*प्रतिनिधी दि.
येथिल रेल्वे स्थानकावर मालधक्का व शेड उभारणीसाठी मंजूरी देण्यात आली . यामुळे उदगीर येथून धान्याच्या दळणवळणाला सुरूवात होनार आहे. अखेर रेल्वे संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश आले असल्याची माहीती संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दिली आहे. उदगीर रेल्वे स्थानकावर निजामकाळात मालधक्का व रेल्वे गोडाऊन सुविधा उपलब्ध होती .कालांतराने ती नामशेष झाली सीमावर्ती भागाशी जोडलेल्या उदगीरची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असुन मोठ्या प्रमाणात शेतमाल खरेदी विक्री होते .
विशेषत: सोयाबिन व तुर या धान्याची मोठी उलाढाल असते . गेल्या अनेक वर्षापासुन व्यापारी वर्गाने व उदगीर रेल्वे संघर्ष समितीने मालधक्का उभारण्यासाठी मागणी केली होती .
उदगीर रेल्वेस्थानकावर यासाठी मुबलक जागाही उपलब्ध आहे . 2019 मध्ये दक्षिण मध्येरेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्या उदगीर येथे आले असता व्यापारी , लोकप्रतिनिधी , व रेल्वे संघर्ष समितीने त्यांची भेट घेऊन ही मागनी केली होती .
दक्षिण -मध्ये रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन ही मंजूरी दिली असुन संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले आहे.
2014-15साली उदगीर येथून 5 कोटी रुपयांच्या मालाचे दळणवळणही करण्यात आले होते.
या निर्णयाचे स्वागत बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील , व्यापारी सागर महाजन , कैलास पाटील , बालकृष्ण मुक्कावर, आदींनी केले या मागणीसाठी उदगीर रेल्वे संघर्ष समीतीचे रमेश अंबरखाने, मोतीलाल डोईजोडे, उमाकांत वडजे, विजय पारसेवार आदींनी पुढाकार घेतला, या स्थानकावर मुबलक जागा आहे . रेल्वे प्रशासनाने बीओटी तत्वावर शीतगृह व व्यापारी संकूल उभारण्यास मंजूरी द्यावी जेणे करून येथिल व्यापाऱ्यांना माल दक्षिण आणि उत्तर भारतात पाठवण्यास मदत होईल अशी मागणी येथिल व्यापाऱ्यांनी रेल्वे प्रशासणाकडे केली आहे,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा