*करमाळा तालुका प्रतिनिधी-अतुल वारे पाटील*
करमाळा तालुक्यामधून पुणे पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अरूण गणपत लाड आणि जयंत आसगांवकर यांना मताधिक्य मिळवून देणार असून निवडणुक जाहिर होऊन उमेदवार फायनल झाल्या पासून मी, राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुक कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील करमाळा शहर अध्यक्ष शिवराज जगताप ,युवा नेते गौरव झांजुर्णे ,आशपाक जमादार सह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी अगदी जीव ओतून प्रचार करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. मतदार यादी प्रमाणे गाव व गावातील असणारे पदवीधर मतदार यांच्या सोबत थेट संपर्क साधत आसून निवडणुकीत प्रचारात मतदार हे राष्ट्रवादी काँग्रेस च्या पारड्यात झुकते माप टाकतील असा आत्मविश्वास आम्हाला आहे त्यामुळे करमाळा तालुक्या मधून नक्कीच आम्ही मताधिक्य देऊ असा विश्वास आप्पासाहेब झांजुर्णे यांनी व्यक्त केला आहे. आमदार रोहित दादा पवार आज करमाळा तालुका दौरा आले आसता त्या वेळी आप्पासाहेब झांजुर्णे देखील त्यांच्या सोबत होते त्या वेळी ते पत्रकारांशीबोलत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा