Breaking

मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२०

मधुकरराव चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट अणदूर संचलित सिध्देश्वर विदयालय किलज येथील पुर्वतयारीची संस्थापक अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी केली पाहणी




सलगरा (दि.)प्रतिनिधी / प्रतिक भोसले

  किलज येथे  दिनांक २४ -११-२०२० रोजी  संस्थापक अध्यक्ष मा.श्री सुनिल  चव्हाण यांनी भेट देऊन शाळा सुरु करण्याचे शासन निर्देष विचारात घेवून,
 शालेय परिसर, त्याचबरोबर वर्ग खोल्या  बैठक व्यवस्था इ .पाहणी करून विद्यार्थ्यांनी कोरोना बाबत नेमकी काय खबरदारी घ्यावी, हे विचारात घेऊन त्यांच्या साठी असणाऱ्या मार्गदर्शक सूचना सांगुन मार्गदर्शन केले.
         त्याचबरोबर शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केलेल्या पुर्वतयारीचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
या वेळी मुख्याध्यापक एन.डी.काळे,संजय घोगरे,दयानंद येळकोटे, राजेंद्र चव्हाण,शिरीष गायकवाड व सेविका मंगलबाई कोळी आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा