*टेंभुर्णीतील मंजूर असलेले जुने महामार्गाचे काम सुरु करावे.....जहागीरदार*
***********************************
*AJ 24 Taas News Maharashtra*
*महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यचे हद्द खुणा निशचित करण्याची मागणी*
**********************************
टेंभुर्णी येथे बायपास झाल्यापासून टेंभुर्णी गावातील जुने महामार्गची अवस्था अत्यंत बिकट झाली असुन जागोजागी खड्डे पडले आहे तसेच अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहे त्या मुळे वहान चालकांना जीव मुठीत घेउन वहान चालवावे लागते.खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले असुन काहींना जीव देखील गमवावे लगले आहे.टेंभुर्णीतील जुने महामार्गाचे काम चार वर्षांपुर्वी मंजूर असुन देखील सुरु होत नसल्याने सदरचे मंजूर असलेले काम सुरु करण्याची मागणी सामाजिक कार्येकर्ते बशीर जहागीरदार यांनी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्रालय व केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नवी दिल्ली यांचे कडे केली आहे.
चार वर्षापुर्वी केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाने 109 कोटींचे टेंभुर्णी जुने महामर्गाचे कामासाठी मंजूर केले होते त्याचे भूमिपूजन रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी साहेब व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडण्वीस यांचे हस्ते ऑनलाईन करण्यात आले होते परंतू आजतगायत काम सुरु झालेले नाही त्यामुळे जुने महामर्गाची अवस्था बिकट झाली असुन त्याची दुरुस्ती देखील होत नाही.जुने महामार्गचे काम झाल्यास टेंभुर्णी गावची शोभा वाढेल व मृत अवस्थेत असलेले व्यावसायिकांचे व्यवसायाला नवसंजीवनी भेटेल.
सध्या टेंभुर्णीतील जुन्या महमार्गातील बायपास ते बायपास लक्ष्मीपार्क हॉटेल ते जंजीरा हॉटेल पर्यंत अनेकांनी आपल्या जागेची खरेदी विक्री केलेली आहे अनेक ठिकाणी महामार्गलगत प्लॉटिंग करण्यात आलेली आहे.अनेक गुंठे बहाद्दर महामार्ग हद्दीचे खुणा नसल्याने महामार्गाचे मालकीची जागा देखील विकत आहे त्या मुळे जागा घेणारे अनेकांची फसवणूक या ठिकाणी होत आहे.महामार्ग प्राधिकरण सोलपुर विभाग यांनी टेंभुर्णी येथील जुने महामार्गाचे हद्द खुणा निशचीत करावे व त्या ठिकाणी माईल स्टोन बसवावे तसेच रस्त्याची हद्द व महामार्गापासुन किती अंतरावर्ती बांधकामे करावी याची माहीती फलक गावातील मध्य ठिकाणी लावण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.या सर्व प्रकरणाकडे महामार्ग प्राधिकरण सोलापुर यांनी दुर्लक्ष केले आहे.टेंभुर्णीसहित जिल्ह्यातील महामार्गवरील प्रत्येक गावातील जुन्यामार्गावर प्राधिकरणाने ही मोहीम राबवावी व शासकीय जागेचे संरक्षण करावे असे जहागीरदार यांनी म्हटले आहे.
टेंभुर्णीतील जुने महामार्गाचे काम हे सिमेंट कॉंक्रेटचे मंजूर असुन मधे दिवायडर बसवण्यात येणार होते तसेच दिवायडरचे मधे संपुर्ण रस्त्यावर स्ट्रीट लाईट देखील बसवण्याचे नमुद आहे परंतू मंजूर असलेले जुने महामार्गाचे काम सुरु न झाल्याने टेंभुर्णीकरांचे,व्यपार्यांचे नुकसान झालेले आहे तरी तातडीने हे काम सुरु करण्याची मागणी बशीर जहागीरदार यांनी केली असुन याचे प्रती विभागीय आयुक्त पुणे,जिल्हाधिकारी सोलापुर व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विविध कार्यालयास पाठविण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा