*राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार साहेब यांनी कै.विठोबा(तात्या)भरणे यांच्या आठवणींना उजाळा देत वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली............ भरणे कुटुंबीयांचे केले सांत्वन..........*
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय (मामा) भरणे यांचे वडील आदरणीय कै.विठोबा (तात्या) रामा भरणे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाल्याने आज भरणेवाडी येथील निवासस्थानी दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी आदरणीय कै.विठोबा भरणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वाहीली भावपुर्ण श्रद्धांजली.
यावेळी दीड तासांहून अधिक काळ मा. अजितदादा पवार यांनी थांबून आदरणीय कै.भरणे तात्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी इंदापूर तालुक्यातील हरितक्रांतीचे प्रणेते म्हणून हजारो एकर माळरानावर आधुनिक पध्दतीने शेती करून शेकडो कुटुंबीयांची अर्थिक सुबत्ता वाढवण्याचे कार्य आदरणीय कै.भरणे तात्यांनी केल्याचे सांगून नामदार श्री भरणे मामा यांच्यासह भरणे कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी दौंडचे आमदार श्री राहुलदादा कुल, करमाळाचे माजी आमदार श्री. नारायण (आबा) पाटील,भाजपा नेते श्री बाळासाहेब गावडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रदिपदादा गारटकर, राष्ट्रसंत श्री. मनोहर (मामा)महाराज,माळशिरस तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री रमेश पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री. प्रतापराव पाटील, जेष्ठ नेते श्री. बाळासाहेब करगळ, इंदापूर तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. हनुमंत कोकाटे- पाटील, माजी बांधकाम व आरोग्य सभापती श्री. प्रविणभैय्या माने, जिल्हा परिषद सदस्य श्री अभिजित तांबिले, माजी पंचायत समिती सदस्य श्री सुहास डोंबाळे,इंदापूर तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री अतुल झगडे, श्री सागर मिसाळ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री शुभम निंबाळकर, कार्याध्यक्ष श्री सचिन खामगळ यांच्यासह सर्व पदिधिकारी, कार्यकर्ते व जनसमुदाय उपस्थित होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा