Breaking

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सकाळची वाशिंबे एसटी बस सुरू करा- सौ गायत्री महेशकुमार कुलकर्णी**




*विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सकाळची वाशिंबे एसटी बस सुरू करा- सौ गायत्री महेशकुमार कुलकर्णी*

*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
 कोरोना काळात बंद असलेली एसटी बस सेवा पूर्वपदावर येत असताना सकाळी उमरड, वाशिंबे,मांजरगाव, करमाळा येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत असून करमाळा येथून सकाळी 8 वाजता सुटणारी वाशिंबे बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी मांजरगावच्या सरपंच सौ गायत्री महेशकुमार कुलकर्णी यांनी आगारप्रमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
   या  निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की सध्या नवी च्या पुढचे वर्ग सुरू झाले असून मांजरगाव वीट, वाशिंबे,करमाळा येथे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी जात असतात .सकाळी ८ वाजता करमाळा येथून सूटणारी वाशिंबे बस कोरोना च्या अगोदर सुरू होती. शाळा सुरू झाल्यामुळे तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तसेच चाकरमान्यांना  ही बस सोयीची आहे. त्यामुळे ही बस तात्काळ सुरू करून विद्यार्थ्यांना प्रवासी पासची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मांजरगावच्या सरपंच गायत्री महेशकुमार कुलकर्णी यांनी आगार प्रमुखांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा