*नरेंद्र मोदी यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सचे भाजप कार्यालयात आयोजन*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*करमाळा
स्व. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला शेतकऱ्यांशी संवाद
स्व. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पी एम किसान योजनेसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे शेतकऱ्यांशी दि. 25 /12 /20 रोजी सकाळी १२:०० वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधला.भाजप कार्यालयात या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले.
यावेळी संवाद साधत असताना शेतकऱ्यांसाठी केलेल्या कायद्याविषयी मोदिंनी सविस्तर माहिती दिली. दरम्यान पी एम किसान योजने अंतर्गत 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर रु. २०००/- प्रमाणे 18 हजार कोटी सन्मान निधी जमा करण्यात आला
यानंतर शेतकऱ्यासाठी मंजूर झालेल्या कायद्याविषयीचे केंद्रीय कृषीमंत्र्यांचे पत्रक शेतकऱ्यांना देण्यात आले
व्हिडिओ कॉन्फरन्स झाल्यानंतर स्व. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.यावेळेस विस्तारक भगवान गोसावी यांनी अटलजींच्या जीवन चरित्राची माहिती दिली. तर आभार किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजयकुमार नागवडे यांनी मानले
यावेळी जिल्हाउपाध्यक्ष किरण बोकन, तालुका सरचिटणीस सुहास घोलप , युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार , मा.तालुकाउपाध्यक्ष दादासो देवकर,विश्व हिंदू परिषदेचे संतोष वाळुंजकर, मा.शहरउपाध्यक्ष अक्षय कुंभार, सूरज शेख, महिला आघाडी तालुकाध्यक्ष अश्विनी भालेराव, मा. शहराध्यक्ष वनिता साळुंखे , जिल्हा कार्यकारणी सदस्य राजश्री खाडे ,चंपावती कांबळे, मनोज मुसळे मच्छिंद्र हाके, हर्षद गाडे , माणिक निळ, भारत चौधरी ,संदेश शिंदे ,महेश कदम आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा