*सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील यांचे निधन*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
जातेगाव ता करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर नारायण पाटील यांचे रविवारी रात्री अल्प आजाराने निधन झाले.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर ते कार्यरत होते.त्यांच्यामागे पत्नी ,विवाहित मुलगी,मुलगा,सून असा परिवार आहे. परिसरातील सामाजिक ,शैक्षणिक ,धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.तुळजाभवानीचे निस्सीम भक्त म्हणून ते सर्वपरिचित होते. येथील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिराची त्यांनी उभारणी केली. अतिशय मनमिळाऊ स्वभावामुळे ते अबाल वृद्धात लोकप्रिय होते.त्यांच्या अकाली जाण्याने परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा