विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र रणवरे यांचा राजीनामा...
बेंबळे।मुकुंद रामदासी।
माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र सूर्यकांत रणवरे यांनी बारा वर्षे सहा महिने च्या आपल्या नोकरीच्या कारकिर्दीनंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्या कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांचेकडे आज दिनांक 31 डिसेंबर 20 20 रोजी सुपूर्त केला.
राजेंद्र रणवरे यांच्या कार्यकारी संचालक पदाच्या कारकिर्दीत , कारखान्याचे अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन तीन हजार मेट्रिक टनावरून आज प्रतिदिनी 12 हजार मेट्रिक टनापर्यंत गेलेली आहे तसेच राज्य पातळीवरच नव्हे तर देशपातळीवर कारखान्याचा नावलौकिक झालेला आहे तसेच या कारखान्यास राज्य व देशपातळीवरील अनेक गौरवास्पद पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
चौकट.....
रणवरे यांच्या कार्यकारी संचालक पदाच्या राजीनाम्या बद्दल या कारखान्याचे संचालक व कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजीत भैया शिंदे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनीही या रणवरे--- राजीनामा व्रत्तास दुजोरा दिलेला आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा