आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराबद्दल बापूसाहेब अडसूळ यांचा सत्कार
टेंभुर्णी (प्रतिनिधी):- सद्संकल्प शिक्षण व समाज सेवा संस्था सोलापूर या संस्थेच्या मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव तालुका माढा ह्या शाळेचे मुख्याध्यापक श्री बापूसाहेब अडसूळ यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय शिक्षण संस्था टेंभुर्णी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. ते आदर्श कर्तव्यदक्ष व अभ्यासू मुख्याध्यापक म्हणून कोल्हापूर विद्यापीठ ज्ञान विद्या गौरव समितीच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श व कृतिशील मुख्याध्यापक म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला.या निमित्ताने श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय शिक्षण संस्था टेंभुर्णी च्या वतीने संस्थेचे संस्थापक हरिचंद्र गाडेकर सर व शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष यशवंत लोंढे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच संस्थेचे खजिनदार अमोल खरसांडे यांचा वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.मुख्याध्यापक बापूसाहेब अडसूळ हे यापूर्वीही अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.ग्रामीण भागामध्ये त्यांचे विशेष कौतुक होत आहे.एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना ते तुळजाभवानी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, सार्थक बहुद्देशीय समाजसेवी संस्था सल्लागार, व सदश्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती या पदाच्या माध्यमातून हे ते सतत कार्यरत असतात. यावेळी चव्हाणवाडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष बापू इंदलकर,परिवहन समितीचे अध्यक्ष उद्योजग नवनाथ नाना शिंदे, कन्या प्रशालाचे मुख्याध्यापक एस. आर. पवार सर, विठ्ठलराव शिंदे विद्यालय आडेगाव चे मुख्याध्यापक बि.डी. जाधव सर, विमलेश्वर विद्यालयाचे दत्तात्रेय ननवरे सर, ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ सटाले,संस्थेचे खजिनदार अमोल खरसांडे, डॉक्टर फाळके प्रशालेचे महावीर आखाडे सर, शिवसेना उपशहरप्रमुख संतोष आप्पा खैरमोडे, उपाध्यक्ष धनंजय भोसले, संदीप हवलदार, प्राचार्य रेखा गाडेकर, सचिव अर्चना गाडेकर, स्वप्निल खरसांडे, निलेश साळुंखे, सौरभ हवलदार,रवींद्र लोकरे उपस्थित होते. सूत्रसंचालन भाई-भाई विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा आदर्श निवेदक गणेश कोकाटे सर यांनी केले आभार शाळेचे उपक्रमशील व कृतिशील शिक्षक संदीप साळवे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा