Breaking

बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

विठोबा रामा भरणे यांच्यावरती भरणेवाडीत शोकाकुल वातावरणात झाले अंत्यसंस्कारइंदापूर




विठोबा रामा भरणे यांच्यावरती भरणेवाडीत शोकाकुल वातावरणात झाले अंत्यसंस्कार
इंदापूर प्रतिनिधी/ शिवाजी पवार

राज्याचे सार्वजनिक बांधकाम,वने, दुग्ध व पशुसंवर्धन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना झाला पित्रृशोक  विठोबा (तात्या ) रामा भरणे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भरणेवाडीत मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थिती अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या काही दिवसापासून आजारी असल्यामुळे त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी रात्री सव्वाअकरा वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह चार मुले व तीन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

अंत्यविधीस माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, करमाळाचे आमदार संजय शिंदे, माजी आमदार रामहरी रुपनवर, दौंडचे माजी आमदार व पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, सोनाई चे प्रमुख दशरथ माने,महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सांत्वन भेट..

राज्यमंञी व सोलापूर जिल्हाचे पालकमंञी मा. दत्ता भरणे यांचेावडील विठ्ठल भरणे यांचे दु:खद निधन झाल्याने राज्याचे उपमुख्यमंञी मा. अजितदादा पवार यांनी अाज भरणे मामा यांच्या कुटुंबीयांची निवसस्थानी भेट घेऊन सांत्वन करुन प्रतिमेचे दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली…

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा