Breaking

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

शेतकऱ्यांवरील खोट्या गुन्ह्यांची तसेच पोलिसांच्या दमबाजीची चौकशी करण्याच्या आश्वासनानंतर स्वाभिमानीचे उपोषण मागे**










*शेतकऱ्यांवरील खोट्या गुन्ह्यांची तसेच पोलिसांच्या दमबाजीची चौकशी करण्याच्या आश्वासनानंतर स्वाभिमानीचे उपोषण मागे*

*करमाळा तालुका प्रतिनिधी-अतुल वारे पाटील*
   करमाळा तालुक्यातील निमगाव ह येथील मारुती नीळ व त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत तसेच पोलीसांनी केलेल्या दमदाटीच्या चौकशीच्या मागणीसाठी सुरू असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे व पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
     सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते.प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांनी आंदोलन कर्त्यांनी भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती करत दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गोडगे,करमाळा तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके,युवा तालुकाध्यक्ष अमोल घुमरे, ता पक्षाध्यक्ष बापू फरतडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा गोवर्धन चवरे पाटील,स्वाभिमानीचे नेते दीपक शिंदे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा