*बार्शी येथील राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार निवारण च्या वतीने covid १९ योद्धा पुरस्कारांने नौदल अधिकारी विश्वनाथ गायकवाड यांना सन्मानित*
*टेंभुर्णी/ प्रतिनिधी*
राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार निवारण (भारत) यांचा वतीने देण्यात आलेल्या covid १९ योद्धा पुरस्कारांने वरवडे गावचे सुपुत्र भरतीय व्यापारी नौदल अधिकारी विश्वनाथ गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.
बार्शी येथे राष्ट्रिय मानव अधिकार आयोग व भ्रष्टाचार निवारण भारत या संघटनेचा महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी नवनियुक्त झालेल्या अल्ताफ सय्यद यांच्या नियुक्ती पत्र वितरण व सन्मान सोहळ्यामध्ये COVID १९ योद्धा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
या मधे भारतीय व्यापारी नौदल अधिकारी विश्वनाथ गायकवाड यांना विविध पेट्रोल पंपावरती कारवाई करत COVID चे महत्व पटवून देत . कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्यासाठी प्र वृत्त केल्या बदल पुरस्कार देण्यात आला.
या वेळी असेगावचे पोलीस पाटील महावीर इथापे व असुगावचे शिक्षक शफिल पटेल यांचा ही COVID योद्धा पुरस्काराने गवरव करण्यात आला.
हा पुरस्कार राष्ट्रिय मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण भारत चे राष्ट्रिय सचिव रमेश गनगे,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मनिषताई करडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविण कुमार चिथे यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये देण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितांमध्ये संभाजी ब्रिगेड चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ राऊत व राष्ट्रिय मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण भारत चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अंकुश गायकवाड यांचा समावेश होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा