पंढरीत डॉ निकम हॉस्पिटलच्या वतीने मोफत शिबिराचे आयोजन
11 वर्षाची परंपरा जपत होणार गुडघे, खांदे, आणि खुब्यावर होणार मोफत तपासणी
रविवार दि7 फेब्रुवारी होणार दुपारी 2 वाजेपर्यंत तपासणी आणि उपचार
पंढरपूर -: प्रतिनधी
पंढरपूर येथील प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ प्रशांत निकम यांच्या सरगम चौक येथील निकम हॉस्पिटल येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ प्रशांत निकम यांनी दिली आहे
मागील11वर्षाची परंपरा जपत या वर्षीही रविवार दि7फेब्रुवारी रोजी सकाळी10ते दुपारी2 वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. आयोजितया शिबिरामध्ये गुडघे, खांदे, आणि खुबे, या मधील विविध आजारावर मोफत तपासणी होणार आहे.
या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या रुग्णाची ज्वाईंट रिप्लेसमेंट सर्जन कडून मोफत तपासणी, हाडाची घनता तपासणीसाठी केवळ1500 रुपयेफी, एक्सरे साठी50 टक्के सवलत, रक्त लघवी साठी50 टक्के सवलत, औषधांवर5टक्के सवलत, फिजिओथेरपी साठी25 टक्के सवलत,यासह इतर कोणत्याही ऑपरेशन साठी50 टक्के सवलत या हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरासाठी ठेवण्यात आली आहे.
पंढरपूर येथे प्रथमच सवलतीच्या दरात सांधेरोपण, आणि दुर्बिणीतूत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.ययासाठी दीड लाखापर्यंत खर्च असलेल्या या गूढग्याच्या सांधेरोपन साठी केवळ सवलतीच्या दर म्हणून90 हजार रुपयेत फी आकारण्यात येणार आहे ,दुर्बिणीतील शस्त्रक्रियेसाठी 70 हजार ऐवजी केवळ40 हजारमध्ये केले जाणार आहे.
या हॉस्पिटल चे केवळ150 रुपये फी भरुन सभासद झाल्यास अनेक फायदे मिळणार आहेत. सहा महिने तपासणी फी मध्ये25 टक्के सवलत, एक्सरे साठी25 टक्के सवलत, रक्त ,लघवी तपासणीसाठी 25 टक्के सवलत, ऍडमिट बिल सवलत25 टक्के, ऑपरेशन साठी25 टक्के सवलत, आदी विविध सवलतीचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी उपस्थित राहावे असे आवाहनही डॉ प्रशांत निकम यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा