प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूलमध्ये साधेपणाने प्रजासत्ताक दिन साजरा....
।। नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार।।।
बेंबळे। प्रतिनिधी।
हरीनगर- बेंबळे येथील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये प्रजासत्ताक दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक म्हणून निवड झालेले औदुंबर तुकाराम पवार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे सचिव बी.बी. इंगळे यांनी मार्गदर्शन करून संविधानाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी बेंबळे ग्रामपंचायतीमध्ये नुकतेच विजयी झालेल्या सिद्धेश्वर आघाडीच्या 12 सदस्यांचा, संस्था अध्यक्ष पोपटराव अनपट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या समारंभास माजी सरपंच कैलास भोसले, विकास अनपट ,विजय पवार, मुकुंद रामदासी, सिद्धेश्वर शिंदे, राजेंद्र जगताप, अशोक काळे, बाळासाहेब हुलगे, बबलू काळे, दादा काळे, सौ. नमिता अनपट ,माजी पोलीस पाटील माणिक किर्ते, अशोक देवकर, प्राचार्य देशमुख, आबासाहेबा अनपट, संभाजी चोरमल, सुग्रीव मदडे ,गणेश हुलगे, विश्वजीत भोसले, नाना भोसले, दीपक कीर्ते, संतोष शिंदे, नामदेव कांबळे ,भारत कोळी, गोरक अनपट ,लक्ष्मण माने ,आबा लोंढे, दादा लोंढे, विठ्ठल गायकवाड आदी मान्यवरांच्या सहित गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोंढे व चोरमले मँडम यांनी केले, आभार प्रदर्शन प्राचार्य देशमुख यांनी मानले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा