*टेंभुर्णी येथे किरकोळ कारणावरून तरुणास मारहाण सहा जणांवर गुन्हा दाखल*
टेंभुर्णी प्रतिनिधी दि. 21.
टेंभुर्णी येथील ईरा पब्लिक स्कूल मध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या निखिल देवराम सरवदे (वय. 23) रा. टेंभुर्णी यांस सहा जणांनी भांडणाच्या कारणावरून मारहाण केल्याची घटना टेंभुर्णी येथे घडली.
टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून मिळालेले सविस्तर माहिती अशी की फिर्यादी निखिल सरवदे व ओम लोंढे यांचे मध्ये काल आजोबांच्या अंगावर पॅगो टमटम आल्याच्या कारणावरून सकाळी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात ठेवून सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान फिर्यादी निखिल सरवदे हा यशपाल लोंढे यांचे घरा समोर बसला असताना तेथे ओम लोंढे व त्याच्यासोबत विशाल नागनाथ पवार, सज्जन दिलीप पवार, योगेश उर्फ छकुला पवार, रोहन जाधव, व इतर अनोळखी इसम तीन ते चार दुचाकीवर तेथे आले त्यातील विशाल पवार यांनी फिर्यादीस ओम लोंढे यांस शिवीगाळ का केले असे विचारत काठीने मारून फिर्यादीस खाली पाडले व इतरांनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारून जखमी केले. विशाल पवार याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पोटरी वरती मारून हात फॅक्चर केला. तसेच त्यांच्या गळ्यातील सव्वा तोळे वजनाचे सोन्याची चैन हिसकावून घेतली नंतर फिर्यादीने आरडाओरडा केले असता यशपाल लोंढे, विकी लोंढे, अजय ओहोळ यांनी त्या ठिकाणी येऊन सोडवा सोडवी केली त्यानंतर आरोपी शिवीगाळ करून मोटरसायकल वरून निघून गेले. सदर घटनेची नोंद टेंभुर्णी पोलीस ठाण्यांमध्ये झाली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून. पुढील तपास पोनि राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काशीद हे करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा