सुरेखा शिंदे-रावणगावकर यांना सावित्रीबाई फुले,नरहर कुरुंदकर पुरस्कार जाहीर...
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
नांदेड जिल्हा परिषदेतर्फे २०२० या वर्षाचा जिल्हास्तरीय सावित्रीबाई फुले व कै नरहर कुरुंदकर पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली असून त्यात राजीव गांधी विद्यालय नांदेड येथे कार्यरत असलेल्या उपक्रमशील पदवीधर शिक्षिका तथा जिजाऊ ब्रिगेडच्या मा.जिल्हा अध्यक्षा सुरेखा शिंदे रावणगावकर यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचा वितरण सोहळा दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०:३० वाजता कुसुम सभागृह आय.टी.एम परिसर नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
सुरेखा शिंदे-रावणगावकर यांचे शैक्षणिक व सामाजिक चळवळीतील सक्रिय योगदान पाहून आणि पंचवीस वर्षाच्या सेवेत त्यांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तावाढीसाठी राबविलेले विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रम तसेच जिजाऊ ब्रिगेड ह्या सामाजिक महिलाच्या संघटनेच्या संघटक कार्याध्यक्ष, व नंतर जिल्हाध्यक्षा हे मानाची पदे भुषवली तसेच सेवादास शिक्षक पतपेढी सिडको डायरेक्टर मेंबर,मराठवाडा सेवाभावी संस्था नांदेड सचिव यासह सामाजिक शैक्षणिक कामात सतत महिलांच्या व्यथा अत्याचार ह्या वर पेपर मध्ये लिखाण महिल्यांच्या अत्याचार विरोधात मोर्चा आंदोलनात सक्रिय सहभागी.गरीब मुलीच्या लग्नात मनी मंगळसुत्र भेट आर्थीक परिस्थिती बिकट असलेल्या मुलांना शालेय साहित्य वाटप अनाथ आश्रमातील मुलींना साडी ड्रेस वाटप कोविड मध्ये अन्नाची किट साठी आर्थिक मदत अपंग खेळाडू मुलीला आर्थिक मदत जिजाऊ स्रुष्टीला आर्थिक मदत. इत्यादी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा